पिंपरीच्या स्मार्ट सिटीतील भ्रष्टाचार पोचला संसदेत

पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीतील कामांत मोठा भ्रष्टाचार असल्याने या कामांची उच्चस्तरीय चौकशी, करुन त्यातील दोषींवर कारवाई करण्याची बारणे यांची मागणी.
पिंपरीच्या स्मार्ट सिटीतील भ्रष्टाचार पोचला संसदेत
Barne .jpg

पिंपरी : पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीतील कामांत मोठा भ्रष्टाचार असल्याने या कामांची उच्चस्तरीय चौकशी, करुन त्यातील दोषींवर कारवाई करण्याची मागणी, शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी शनिवार (ता. १३ फेब्रुवारी) रोजी लोकसभेत केली. 

पिंपरी चिंचवड शहरातील स्मार्ट सिटीच्या कामात तीनशे ते पाचशे कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार यापूर्वीच शिवसेनेच्या पुणे जिल्हा महिला संघटिका सुलभा उबाळे आणि शहरप्रमुख योगेश बाबर यांनी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या निकटच्या भाजप आमदाराच्या कंपनीला स्मार्ट सिटीचे काम दिले असून त्याच्या निविदा प्रक्रियेत अनियमितता झाल्याचे त्यांनी त्यात म्हटले होते. या गैरव्यवहारात पालिकेतील सत्ताधारी भाजपचे दोन्ही कारभारी आमदार आणि महानगरपालिका आयुक्त सुद्धा सहभागी असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यानंतर बारणे यांनी संसदेत हा प्रश्न मांडला. 

स्मार्ट सिटीच्या विषयावर लोकसभेत बोलताना बारणे म्हणाले की, पिंपरी  चिंचवड स्मार्ट सिटीतील काम हे निव्वळ देखावा आहे. त्यातील सल्लागार एजन्सी ही ठेकेदारांशी मिलीभगत करुन प्रस्ताव तयार करत आहे. त्यामुळे ठेकेदारांना लाभ मिळत आहे. मात्र, केंद्र, राज्य सरकार आणि महापालिकेचे मोठे नुकसान होत आहे.

पूजा चव्हाणचा मोबाईल मिळवण्याचा प्रयत्न करणारी 'ती' व्यक्ती कोण?

स्मार्ट सिटीतील अनेक कामे एकाच कंपनीला मिळत असून मूळ ठेकेदार सब ठेकेदारांना काम देतो आहे. त्यामुळे कामाचा दर्जा न राहता मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात स्मार्ट सिटीअंतर्गत चालू असलेल्या सर्वच कामांची उच्चस्तरीय चौकशी करुन कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बारणे यांनी केली आहे.  

निवडणुका चालतात..मग फक्त शिवजयंतीवरच निर्बंध का.. 
 
पिंपरी : सरकारला विधानपरिषद निवडणूक चालते... मेळावे चालतात. त्याला होणारी गर्दी चालते, ग्रामपंचायत निवडणुका चालतात..मग, शिवाजीमहाराजांची जयंतीच का चालत नाही ? तिच्यावरच निर्बंध का अशी थेट विचारणा मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी राज्य सरकारला केली आहे. हे निर्बंध रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक परिपत्रक काढून शिवजयंती साजरी करण्यावर काही निर्बंध आणले आहेत. तसेच ती साधेपणाने साजरी करण्याचे आवाहनही केले आहे. त्यावर राज्यभरातून शिवभक्तांच्या तीव्र प्रतक्रिया येत आहेत. त्याअनुषंगाने सद्यस्थितीत आम्हीही शिवजयंती साध्या पद्धतीने, शांततेत साजरी केली असती, असे पाटील म्हणाले. पण, मग सरकारला विधानपरषदेच्या निवडणुका कशा चालतात. मेळावेही भरले जातात.

त्याला गर्दी होते, ग्रामपंचायत निवडणुकही होते. चित्रपटगृह पूर्ण क्षमतेने सुरु होतात. तर, मग शिवजयंतीच सरकारला का चालत नाही असा सरकारला कोंडीत पकडणारा प्रश्न त्यांनी विचारला आहे. आमचं, तर असं म्हणणं आहे की तिथीनुसार शिवजयंतीचा आग्रह सोडून शिवसेनेने तारखेनुसारच्या शिवजयंतीमध्ये सहभागी होऊन एकच शिवजयंती साजरी करावी, अशी कोपरखळी त्यांनी मारली.

Edited By - Amol Jaybhaye

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in