पिंपरी : मावळ (जि. पुणे) तालुक्यातील 103 ग्रामपंचातींपैकी 53 ठिकाणी महिला सरपंच होणार आहेत. सर्वसाधारण तथा खुला (ओपन) आणि ओबीसींसाठी (इतर मागासवर्गीय) सरपंचपद राखीव झालेल्या ग्रामपंचातीमध्येही महिलाराज येणार आहे. कारण तेथेही पुरुषांच्या तुलनेत एका ग्रामपंचायतीत महिला सरंपच जास्त होणार आहे. दोन मोठ्या ग्रामपंचायतीतही महिलाच सरपंच असणार आहेत.
मावळ तालुक्यातील 57 ग्रामपंचायतीची निवडणूक नुकतीच झाली, त्यातील आठ बिनविरोध झाल्या. उर्वरीत 49 ठिकाणी मतदान झाले. त्या व भविष्यात निवडणूक होणाऱ्या अशा तालुक्यातील इतर अशा सर्व 103 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आज सोडत काढण्यात आली. त्यातील निम्यापेक्षा जास्त म्हणजे 53 ठिकाणचे सरपंचपद महिलांसाठी आरक्षित निघाले, अशी माहिती मावळचे तहसीलदार मधूसुदन बर्गे व नायब तहसीलदार रावसाहेब चाटे यांनी "सरकारनामा'ला दिली.
नवलाख उंबरे व कुसगाव बुद्रूक या मोठ्या ग्रामपंचायतमध्ये महिला सरपंच होणार आहेत. ओबीसी आरक्षण निघालेल्या 25 पैकी 13 ठिकाणी, तर खुल्या 51 पैकी 26 ग्रामपंचायतीत महिला सरपंच असणार आहेत. त्याजोडीने अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमाती (पाच), बिगर अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जाती (पाच) आणि अनुसूचित जमाती (चार) असे मिळून मावळात महिलाराज येणार आहे.
अनुसूचित क्षेत्रातील (आदिवासी) ग्रामपंचायतीचे आरक्षण (एकुण 10 ग्रामपंचायती)
अनुसूचित जमाती स्त्री आरक्षण (एकुण 5 ग्रामपंचायती) ः माळेगाव, सावळा, वडेश्वर, कुणे (ना. मा.), शिरदे.
अनुसूचित जमाती आरक्षण (एकुण 5 ग्रामपंचायती) ः खांड, कुसवली, कशाळ, इंगळूण, उदेवाडी.
बिगर अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायती (एकुण 93 ग्रामपंचायती)
अनुसूचित जाती स्त्री आरक्षण (एकुण 5 ग्रामपंचायती) ः भाजे, कान्हे, तुंग, सांगिसे, दारुंब्रे.
अनुसूचित जाती आरक्षण (एकुण 4 ग्रामपंचायती) ः सांगावडे, खडकाळा, मोरवे, आढले खुर्द.
अनुसूचित जमाती स्त्री आरक्षण (एकुण 4 ग्रामपंचायती) ः करुंज, नाणे, जांभूळ, लोहगड.
अनुसूचित जमाती आरक्षण (एकुण 4 ग्रामपंचायती) ः ऊर्से, कुरवंडे, सोमाटणे, डोंगरगाव
नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री आरक्षण (एकुण 13 ग्रामपंचायती) ः चांदखेड, मुंढावरे, आंबेगाव, बेबडओहोळ, वाकसाई, औंढे खुर्द,
माळवाडी, देवले, ताजे, पुसाणे, भोयरे, शिलाटणे, गोडूंब्रे.
नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षण (एकुण 12 ग्रामपंचायती) ः निगडे, सुदूंबरे, शिवली, इंदोरी, वराळे, नाणोलीतर्फे चाकण, दिवड, कडधे, थुगाव, शिवणे, घोणशेत, साते.
सर्वसाधारण स्त्री आरक्षण (एकुण 26 ग्रामपंचायती) ः आपटी, केवरे, नवलाख उंब्रे, परंदवडी, करंजगाव, उकसान, मळवंडी ठुले, टाकवे खुर्द, आढले बुद्रूक, आंबळे, वेहेरगाव, काले, ठाकूरसाई, साई, कांब्रे नामा, पाचाणे, कोंडीवडे अमा, आढे, येळसे, ओझर्डे, कार्ला, कुसगाव पमा, कुसगाव बुद्रूक, मळवली, तिकोणा, आंबी.
सर्वसाधारण आरक्षण (एकुण 25 ग्रामपंचायती) ः वरसोली, गोवित्री, साळूंब्रे, शिळींब, कोथुर्णे, जांभवडे, चिखलसे, धामणे, कुसगाव खुर्द, पाटण, कल्हाट, महागाव, डाहुली, गहुंजे, सुदवडी, ओवळे, शिरगाव, बऊर, डोणे, टाकवे बुद्रूक, मळवंडी पमा, अजिवली, वारु, खांडशी, येलघोल

