डमी अरुण लाड उभे करण्याचा विरोधकांचा डाव फसला  - Pune Graduate Constituency Election Opposition Strategy Failed | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा. याशिवाय सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांनीही त्या पुढे ढकलाव्यात अशी राज्य सरकारची सूचना
Breaking - दहावी-बारावीच्या परिक्षा पुढे ढकलल्या

डमी अरुण लाड उभे करण्याचा विरोधकांचा डाव फसला 

उत्तम कुटे
शुक्रवार, 4 डिसेंबर 2020

पुणे पदवीधर मतदारसंघात दुसरे अरुण लाड यांना अपक्ष म्हणून उमेदवारी देऊन राष्ट्रवादीचे उमेदवार अरुण गणपती लाड यांची मते घेत दगाबाजी करण्याचा विरोधकांचा डाव फसला आहे.अपक्ष लाडांना अवघी २,५५४ मते मिळाली असून विजयी लाडांचे मताधिक्यच मुळी ४८,८२४ एवढे दणदणीत आहे.

पिंपरी : पुणे पदवीधर मतदारसंघात दुसरे अरुण लाड यांना अपक्ष म्हणून उमेदवारी देऊन राष्ट्रवादीचे उमेदवार अरुण गणपती लाड यांची मते घेत दगाबाजी करण्याचा विरोधकांचा डाव फसला आहे.अपक्ष लाडांना अवघी २,५५४ मते मिळाली असून विजयी लाडांचे मताधिक्यच मुळी ४८,८२४ एवढे दणदणीत आहे.

प्रतिष्ठेच्या या लढतीत काट्याची टक्कर होईल, असा अंदाज होता.पण,ती एकतर्फीच झाली.राष्ट्रवादीच्या लाडांनी १,२२,१४५ मते घेतली. तर,त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे संग्राम देशमुख यांना ७३,३२१ मते मिळाली. सोशल मिडियात उमेदवारांत सर्वाधिक फॉलोअर असलेल्या मनसेच्या अँड रुपाली पाटील-ठोंबरे या तिसऱ्या नंबरवर राहिल्या. त्या व श्रीमंत कोकाटे यांना अपेक्षित मते मिळाली नाहीत. कोकाटे चौथ्या क्रमांकावर राहिले. त्यांनी ६,५५२ मते घेतली.

पुणे पदवीधरमध्ये तब्बल ६२ उमेदवार रिंगणात होते.त्यातील ३३अपक्षांना फक्त दोनअंकी मते मिळाली.तर,१८ जणांनी मतांचा तीन आकडा पार केला.सर्वात कमी म्हणजे अवघी दहा मते संजय मागाडे या अपक्षाला मिळाली. या मतदारसंघात एकदा आमदार राहिलेले जनता दल सेक्यूलरचे शरद पाटील यांना ४,२५९ मतांवर समाधान मानावे लागले.राष्ट्रवादीच्या लाडांची मते खाण्यासाठी उभे करण्यात आलेल्या दुसऱ्या लाडांचे मतदारांनी फारसे लाड केलेच नाहीत. 

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख