पदवीधर मतदार नावनोंदणीचे भाजपचे नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांनाही टार्गेट

पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झालेली नसतानाही भाजपने तेथे जोरदार तयारी आतापासूनच सुरु केली आहे. जो अधिक मतदार नोंदणी करेल,तो पक्ष व उमेदवार विजयी होत असल्याने सध्या या मतदारसंघात पदवीधर उमेदवार नोंदणीची भाजपमध्ये लगीनघाई सुरु आहे
BJP Electoral Registration Campaign in PCMC
BJP Electoral Registration Campaign in PCMC

पिंपरी : पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झालेली नसतानाही भाजपने तेथे जोरदार तयारी आतापासूनच सुरु केली आहे. जो अधिक मतदार नोंदणी करेल,तो पक्ष व उमेदवार विजयी होत असल्याने सध्या या मतदारसंघात पदवीधर उमेदवार नोंदणीची भाजपमध्ये लगीनघाई सुरु आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवडमधील प्रत्येक नगरसेवक व पदाधिकाऱ्याला विशिष्ट मतदार नोंदणीचे लक्ष्य देण्यात आले आहे. त्याकरिता शहरात पदवीधर मतदार नोंदणी विशेष अभियानच ५ नोव्हेंबरपर्यंत राबविले जात आहे.

पिंपरी-चिंचवसाठी १५ हजार पदवीधर नवमतदार नोंदणीचे लक्ष्य आहे. प्रत्यक्षात त्यापेक्षा दुप्पट ते होईल, असा दावा शहर भाजपने केला आहे. प्रत्येक नगरसेवकाला नव्याने दोनशे पदवीधर मतदारांची नोंदणी करण्याचे टार्गेट देण्यात आले आहे. एका नगरसेवकानेच त्याला दुजोरा दिला. स्विकृत नगरसेवकही त्याला अपवाद नाहीत. टार्गेटपेक्षा अधिक नोंदणी केल्याचे स्वीकृत नगरसेवक राजू सावंत यांनी सांगितले. यासाठी घरोघरी जाऊन पदवीधर उमेदवार मतदार नोंदणीचे अर्ज वाटल्याचे नगरसेविका सुनीता तापकीर म्हणाल्या. 

नगरसेवकांच्या जोडीने पक्ष पदाधिकाऱ्यांनाही भाजपने हे लक्ष्य दिले आहे. प्रत्येक जिल्हा पदाधिकाऱ्याने पन्नास,तर मंडल पदाधिकाऱ्याने प्रत्येकी वीस नवे पदवीधर मतदारांची नोंदणी करायची आहे. नगरसेवकांचे कार्यकर्ते प्रभागात पदवीधरांचा शोध घेत असून घरोघरी जाऊन ते पदवीधर मतदार नोंदणीचा फॉर्म देत आहेत. काही नगरसेवकांनी आपल्या संपर्क कार्यालयात हे काम सुरु केले आहे. त्याजोडीने ऑनलाईन सुद्धा अशी नोंदणी सुरु करण्यात आलेली आहे.आपणही हे पदवीधर नवमतदार नोंदणी अभियान राबवत असल्याची माहिती पालिकेतील सभागृहनेते नामदेव ढाके यांनी दिली. 
कॉलनी असल्याने या मोहिमेला आपल्या प्रभागात चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे कॉलनी,कॉलनीत त्यासाठी शिबिरे लावलेले स्वीकृत नगरसेवक विनोद तापकीर यांनी सांगितले. मात्र, झोपडपट्या असलेल्या प्रभागातील नगरसेवकांना,मात्र तेथे असे मतदारच नसल्याने टार्गेट पूर्ण करताना नाकीनऊ येत आहेत.  

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील हे पुणे पदवीधरचे आमदार होते. ते गेल्यावर्षी कोथरुडमधून (पुणे) निवडूनआले.त्यामुळे ही जागा रिक्त झाली.तेथे जूनमध्येच निवडणूक होणार होती. मात्र,कोरानाने ती पुढे गेली. आत ती मार्चमध्ये होण्याची शक्यता आहे. चंद्रकांतदादा येथून सलग दोनदा आमदार झालेले आहेत. त्यामुळे येथे भाजप हॅटट्रिकच्या तयारीत आहे. त्यात त्यांच्या प्रदेशाध्यक्षांचाच हा मतदारसंघ होता. त्यामुळे तो शाबूत ठेवण्याकरिता त्यांनी तेथील निवडणूक ही प्रतिष्ठेची केली आहे.

त्यात एक अपवाद वगळता येथे भाजपचाच आमदार निवडून येत आहे.त्यामुळे तो त्यांचा बालेकिल्ला झालेला आहे. तो त्यांना शाबूत ठेवायचा आहे. त्यासाठी तेथे निवडणूक जाहीर झालेली नसतानाही त्यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. स्वत चंद्रकातदादा त्यात जातीने लक्ष घालत आहेत. पिंपरी-चिंचवडमधील लक्ष्मण जगताप (चिंचवड) व महेश लांडगे ( भोसरी) हे पक्षाचे दोन्ही यासाठी कामाला लागले असून त्यांनी आपले नगरेसवक व पदाधिकाऱ्यांनाही कामाला लावले आहेत. काल (ता.१) तर शहर भाजपने संपूर्ण शहरात हे विशेष अभियान दिवसभर राबवले. त्यात आठ हजार नव्या पदवीधर मतदारांची नोंदणी करण्यात आल्याची चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे पदवीधऱ नवमतदार नोंदणीप्रमुख अॅड मोरेश्वर शेडगे यांनी 'सरकारनामा'ला दिली.शहरातील पिंपरी,भोसरी आणि चिंचवड या तिन्ही मतदारसंघनिहाय असे नोंदणीप्रमुख नेमण्यात आले आहेत.
Edited By - Amit Golwalkar


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com