अजित पवारांचे संकेत आणि विलास लांडे पुन्हा झाले सक्रीय ! 

हा कार्यक्रम माजी आमदार लांडे यांच्या भोसरीतील लांडेवाडीत होणार आहे.
अजित पवारांचे संकेत आणि विलास लांडे पुन्हा झाले सक्रीय ! 
Ajit Pawar's signal and Vilas Lande became active again

पिंपरी : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त (ता. 12 डिसेंबर) शिरूर लोकसभा मतदारसंघातील 1 हजार 156 ज्येष्ठांना भोसरीत बुधवारपासून (ता. 9 डिसेंबर) डिजिटल श्रवणयंत्रांचे मोफत वाटप केले जाणार आहे. यानिमित्त पिंपरी चिंचवडमधील भोसरीचे प्रथम आमदार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहरातील ज्येष्ठ नेते विलास लांडे पुन्हा सक्रिय झाले आहेत. 

पिंपरी चिंचवडचा शहराध्यक्ष बदलाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकताच दिलेला संकेत आणि लांडे यांची सक्रियता खूप काही सांगून जात आहे. 

नुकत्याच झालेल्या विधान परिषद पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत बंडखोर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्तीच्या उमेदवारी अर्ज दाखल करताना शहरातील पक्षाचे आमदार अण्णा बनसोडे आणि शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील उपस्थित होते. त्यामुळे संतापलेल्या अजितदादांनी शहरातील प्रचार मेळाव्यात या दोघांवर जाहीरपणे नाराजी व्यक्त करीत पक्ष संघटनेत बदल करणार असल्याचा इशारा दिला होता. 

दरम्यान, पिंपरी चिंचवड शहरात लक्ष घातलेल्या खासदार अमोल कोल्हे यांनी पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. हा कार्यक्रम माजी आमदार लांडे यांच्या भोसरीतील लांडेवाडीच्या राजमाता जिजाऊ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात 9 ते 13 डिसेंबर या कालावधीत सकाळी 9 ते 3 या वेळेत होणार आहे. खासदार कोल्हे यांचे "जगदंब प्रतिष्ठान' व इतर संस्थांच्या सहकार्याने कोल्हे यांनी तो आयोजित केला आहे. 

या वेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आमदार दिलीप मोहिते, आमदार अशोक पवार, आमदार अतुल बेनके, आमदार चेतन तुपे, माजी आमदार विलास लांडे उपस्थित राहणार आहेत. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in