व्हाईट काॅलर गुन्हेगारी रोखणे हे टार्गेट - कृष्णप्रकाश

शहरातील व्हाइट कॉलर गुन्हेगारी खपवून घेणार नाही. व्हाइट कॉलर गुन्हेगारीचा बीमोड करण्यासह माथाडीच्या समस्या, अवैध धंदे रोखण्यासाठी 'झिरो टोलेरन्स'वर भर देणार आहे. जनता हीच माझी दूत असून, समाजव्यवस्था बदलण्यासाठी त्यांची मदत घेणार असल्याचे प्रतिपादन पिंपरी-चिंचवडचे नवनियुक्त पोलिस आयुक्त कृष्णा प्रकाश यांनी केले
PCMC Police Commissioner Krishnaprakash
PCMC Police Commissioner Krishnaprakash

पिंपरी  : शहरातील व्हाइट कॉलर गुन्हेगारी खपवून घेणार नाही. व्हाइट कॉलर गुन्हेगारीचा बीमोड करण्यासह माथाडीच्या समस्या, अवैध धंदे रोखण्यासाठी 'झिरो टोलेरन्स'वर भर देणार आहे. जनता हीच माझी दूत असून, समाजव्यवस्था बदलण्यासाठी त्यांची मदत घेणार असल्याचे प्रतिपादन पिंपरी-चिंचवडचे नवनियुक्त पोलिस आयुक्त कृष्णा प्रकाश यांनी केले.

मावळते पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई यांच्याकडून नवनियुक्त पोलिस आयुक्त कृष्णा प्रकाश यांनी शनिवारी (ता. ५) पदभार स्वीकारला. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ उपस्थित होते. कृष्णा प्रकाश म्हणाले, "पिंपरी-चिंचवड परिसर हा औद्योगिक, आयटी हब म्हणून ओळखला जातो. या भागात शैक्षणिक संस्थाही मोठ्या प्रमाणात आहेत. यापूर्वी दक्षिण मुंबई, सांगली, नगर, मालेगाव, बुलडाणा येथे काम केले आहे. प्रत्येक ठिकाणी वेगळ्या समस्या होत्या. या शहराचा अभ्यास करून कार्यपद्धती निश्‍चित करणार आहे.''

अडचण असल्यास संपर्क साधा
नागरिकांना काही अडचण असल्यास त्यांनी आपल्या ८८०५०८११११ या क्रमांकावर मेसेज करावा. तसेच, खूपच महत्त्वाची अडचण किंवा गंभीर गुन्ह्याबाबत माहिती द्यायची असल्यास संपर्क साधावा, असे आवाहन कृष्णा प्रकाश यांनी नागरिकांना केले आहे.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com