पत्नीच्या उमेदवारीचा फटका पतीलाच; पुण्यातून तडकाफडकी मुंबईत बदली

राज्याचे शिक्षण संचालक (माध्यमिक आणि उच्च माध्यमिक) दिनकर पाटील यांची पुण्याहून मुंबईत बालभारतीचे संचालक म्हणून सरकारने तडकाफडकी बदली केली आहे. त्यांच्या पत्नी रेखा या विधानपरिषदेच्या पुणे शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढवित आहेत. त्यामुळे निवडणूक आय़ोगाच्या आदेशानुसार बदली झाल्याचे समजते.
पत्नीच्या उमेदवारीचा फटका पतीलाच; पुण्यातून तडकाफडकी मुंबईत बदली
Rekha Patil - Dinkar Patil

पिंपरी : राज्याचे शिक्षण संचालक (माध्यमिक आणि उच्च माध्यमिक) दिनकर पाटील यांची पुण्याहून मुंबईत बालभारतीचे संचालक म्हणून सरकारने तडकाफडकी बदली केली आहे. त्यांच्या पत्नी रेखा या विधानपरिषदेच्या पुणे शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढवित आहेत. त्यामुळे निवडणूक आय़ोगाच्या आदेशानुसार बदली झाल्याचे समजते.

मात्र, पत्नीच्या प्रचारासाठी पदाचा गैरवापर केल्याची तक्रार गेल्यामुळे पाटील यांची बदली झाल्याची शिक्षण विभागात चर्चा आहे. ती चुकीची असून पत्नी निवडणूक लढवित असल्याने आपली तात्पुरती बदली हद्दीबाहेर निवडणूक आय़ोगाच्या सुचनेनुसार झाली असल्याचे पाटील यांनी 'सरकारनामा'शी बोलताना स्पष्ट केले.

पाटील सध्या गावी कोल्हापूरला आहेत. दिवाळीनंतर १७ तारखेला बदलीच्या ठिकाणी हजर होणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. दीड वर्षातच त्यांची मुदतपूर्व बदली झाली आहे. माझ्या पदाच्या कार्यक्षेत्रात होत असलेल्या पुणे शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत पत्नी उमेदवार असल्याने त्यावर माझा प्रभाव पडेल,ही शक्यता गृहित धरून आयोगाच्या  सुचनेनुसार ही बदली करण्यात आली आहे. 

ती नियमित प्रशासकीय बाब आहे. मात्र, विरोधकांनी तो प्रचाराचाच भाग केल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या पत्नी या भूदरगड,कोल्हापूर येथील विवेकानंद शिक्षण संस्थेच्या लोणी काळभोर  शाळेत शिक्षिका आहेत. त्या अपक्ष म्हणून निवडणूक लढवित आहेत. आचारसंहिता सुरु होण्याआधी चार महिने दिनकर पाटील पदाचा गैरवापर करून पत्नीचा प्रचार करत होते,असा आरोप त्यांच्यावर झाला होता. शिक्षण खात्यातील एक महत्वाचा वरिष्ठ अधिकारी सरकारी नोकर असताना पत्नीसाठी प्रचार करतोय,हे निदर्शनास आल्यामुळे त्यांची बदली झाल्याची चर्चा शिक्षण विभागात ऐकायला मिळाली.
Edited By - Amit Golwalkar

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in