तो मी नव्हेच... रिटायर्ड पोलिसाची चार लग्ने? बलात्काराचा गुन्हा दाखल! - Rape offence registered against Ex Police Constable in Pimpri | Politics Marathi News - Sarkarnama

तो मी नव्हेच... रिटायर्ड पोलिसाची चार लग्ने? बलात्काराचा गुन्हा दाखल!

उत्तम कुटे
सोमवार, 21 डिसेंबर 2020

पहिली बायको जिवंत असताना ती मेल्याचे सांगून दुसरे लग्न करणाऱ्या रिटायर्ड पोलिसाविरुद्ध शहरातील भोसरी पोलिस ठाण्यात बलात्कारासह मारुन टाकण्याची धमकी दिल्याचा गुन्हा काल दाखल करण्यात आला

पिंपरी : पहिली बायको जिवंत असताना ती मेल्याचे सांगून दुसरे लग्न करणाऱ्या रिटायर्ड पोलिसाविरुद्ध शहरातील भोसरी पोलिस ठाण्यात बलात्कारासह मारुन टाकण्याची धमकी दिल्याचा गुन्हा काल दाखल करण्यात आला. या पोलिसाच्या दुसऱ्या बायकोनेच याबाबत फिर्याद दिली आहे.

आपल्याशी लग्न केल्यानंतर आरोपीने आणखी दोन लग्न केल्याचा दावाही फिर्यादीने केला आहे. नमूद करण्याजोगी बाब म्हणजे आरोपी पोलिस याच पोलिस ठाण्यातून दोन वर्षापूर्वी रिटायर झाला आहे. तो तेथील गुन्हे शोध पथकात (डिटेक्शन ब्रँच- डीबी) गुन्हे उकल करण्याचे काम करीत होता.

आरोपीने एकूण चार लग्ने केल्याचा दावा पोलिसांनी,मात्र अमान्य केला आहे. तो खोटा असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यातून ते या रिटायर्ड पोलिसाला वाचविण्याचा,तर प्रयत्न करीत नाही ना,अशी शंका घेतली जात आहे. आरोपीला न झालेली अटक त्याला दुजोराही देत आहे. पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र पोलिस आय़ुक्तालय होण्यापूर्वी या पोलिसाचा शहरात मोठा दरारा होता.पिळदार मिशा व भक्कम शरीरयष्टीने त्याची मोठी छाप होती.तात्या म्हणून ते परिचित होते.

पंडीतराव ऊर्फ तात्यासाहेब बाबूराव तापकीर (वय ६०,रा.चऱ्होली बुद्रूक, ता.हवेली,जि.पुणे) असे संशयित आरोपीचे नाव  असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी विधवा महिलेला त्यांनी आपली बायको मरण पावल्याचे सांगून २०१४ ला पोलिस सेवेत असताना तिच्याशी लग्न केले. त्यापूर्वी व नंतरही त्याने भोसरी,चाकण आणि फुरसुंगी येथील लॉजवर लैंगिक अत्याचार केले,असे फिर्यादीचे म्हणणे आहे. 

यानंतर त्याने एक महिला पोलिस व आणखी एक महिलेशी अशी दोन लग्न केली.त्यामुळे फसवणूक झाल्याने तसेच मारहाणीबरोबर लैंगिक,शारिरीक व मानसिक छळ करून मारून टाकण्याची धमकी आऱोपीने दिल्याने फिर्यादीने पोलिसांत धाव घेतली.
Edited By- Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख