..आणि पोलिस आयुक्तांनी मारली फूटबाॅलला किक

पिंपरी-चिंचवडचे स्पोर्टमन पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी फूटबॉलला किक मारून शहरातील राज्यस्तरीय फूटबॉल स्पर्धेचे उदघाटन केले. आपल्या देशात प्रचंड लोकप्रिय असलेल्या क्रिकेटच्या जोडीने इतर खेळांकडेही लक्ष देण्याची गरज त्यांनी यावेळी प्रतिपादित केली. फुटबॉललाही क्रिकेटसारखी उंची प्राप्त व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
..आणि पोलिस आयुक्तांनी मारली फूटबाॅलला किक
PCMC Police Commissioner Inaugurating Football Competition

पिंपरी : पिंपरी-चिंचवडचे स्पोर्टमन पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी फूटबॉलला किक मारून शहरातील राज्यस्तरीय फूटबॉल स्पर्धेचे उदघाटन केले. आपल्या देशात प्रचंड लोकप्रिय असलेल्या क्रिकेटच्या जोडीने इतर खेळांकडेही लक्ष देण्याची गरज त्यांनी यावेळी प्रतिपादित केली. फुटबॉललाही  क्रिकेटसारखी उंची प्राप्त व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९५ व्या जयंतीनिमित्त शिवसेना यमुनानगर, युवासेना, सुलभाताई उबाळे सोशल फाऊंडेशनच्या वतीने यमुनानगर येथे आयोजित राज्यस्तरीय फूटबॉल स्पर्धेचे उदघाटन केल्यानंतर  पोलिस आयुक्तांनी वरील अपेक्षा व्यक्त केली. तत्पूर्वी त्यांनी शिवसेनाप्रमुखांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. संस्कृत श्लोक उद्धृत करीत मराठीसह हिंदी,इंग्रजीतील त्यांचे भाषण प्रोत्साहित करणारे असेच झाले.

इतर सगळ्या गोष्टींना आपण वेळ देतो,मग खेळाला का नाही,अशी विचारणा करीत प्रत्येकाने कुठला ना कुठला खेळ फिटनेससाठी खेळलाच पाहिजे,असे ते म्हणाले. प्रेक्षकांची संख्या वाढली,तर खेळाडूंना प्रोत्साहन मिळतेच.शिवाय खेळाला प्रायोजकही मिळतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्यामुळे प्रत्येक खेळाला प्रतिसाद देणे गरजेचे असल्याचे सांगितले. शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटक सुलभा उबाळे, शिवसेनेचे विधानसभाप्रमुख धनंजय आल्हाट, नगरसेविका शुभांगी बोऱ्हाडे, तसेच रामभाऊ उबाळे, युवासेनेचे अजिंक्य उबाळे आदी यावेळी उपस्थित होते.
Edited By - Amit Golwalkar

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in