बजेट तयार केले हर्डीकरांनी, सादर करणार मात्र पाटील

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे २०२१-२२चे बजेट उद्या (ता.१८) सादर होणार आहे. वर्षभरावर महापालिका निवडणूक आली असल्याने कुठलीही करवाढ नसलेले हे इलेक्शन बजेट असणार आहे,यात शंका नाही.
बजेट तयार केले हर्डीकरांनी,  सादर करणार मात्र पाटील
PCMC Commissioner to Present Budget to Standing Committee

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे २०२१-२२चे बजेट उद्या (ता.१८) सादर होणार आहे. वर्षभरावर महापालिका निवडणूक आली असल्याने कुठलीही करवाढ नसलेले हे इलेक्शन बजेट असणार आहे,यात शंका नाही. 

या ३९ व्या बजेटचे वैशिष्ट्य म्हणजे ते दोन दिवसांपूर्वीच बदली झालेले आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी तयार केले आहे. मात्र, ते स्थायी समितीसमोर नवीन आयुक्त राजेश पाटील हे मांडणार आहेत. 

त्यामुळे या बजेटवर मावळत्या आयुक्तांची छाप असणार आहे. दर बुधवारी दुपारी दोन वाजता होणारी स्थायी समितीची विशेष सभा उद्या, मात्र सकाळी साडेदहा वाजता बजेटसाठी बोलावण्यात आली आहे. गतवर्षीचे बजेट १७ फेब्रुवारीला सादर करण्यात आले होते. यावेळी ते एक दिवस उशिरा १८ तारखेला मांडले जाणार आहे. पाटील यांचे हे पहिलेच बजेट आहे. 

गतवेळी ते  मूळ ५,२३२ कोटी, तर केंद्र सरकारी योजना धरून ६ हजार ६२७ कोटी ९९ लाख रुपयांचे होते.यावेळी त्यात वाढ होणार, हे निर्विवाद. फक्त ते कोरोनाने शिलकी असेल का याविषयी, मात्र शंका आहे. गतवर्षाचे बजेट हे पाच कोटी ७७ लाख रुपये शिलकीचे होते.चालू असलेली कामे पूर्ण करण्यावर त्यात भर होता.यावर्षी मतदारांना भूरळ पाडतील अशा नव्या योजना वा प्रकल्पांची घोषणा होईल,असा अंदाज आहे.
Edited By - Amit Golwalkar
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in