सतत चर्चेत राहणारे कृष्ण प्रकाश पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त - IPS krishn prakash appointed as police commissiner of pimpri-chinchwad | Politics Marathi News - Sarkarnama

सतत चर्चेत राहणारे कृष्ण प्रकाश पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 2 सप्टेंबर 2020

राज्यभरात आज 45 पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या...

पुणे : पोलिस दलातील बहुचर्चित बदल्यांचा आदेश जारी झाला असून नाशिकचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील (कायदा व सुव्यवस्था) आणि मिलिंद भारंबे (गुन्हे) यांची मुंबईच्या सहआयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. पिंपरी-चिंचवडच्या पोलिस आयुक्तपदी कृष्णप्रकाश यांची नियुक्ती झाली आहे.  नाशिकच्या पोलिस आयुक्तपदी दीपक पांडे यांना संधी देण्यात आली आहे. याबाबतचे वृत्त सरकारनामाने सर्वात आधी दिले होते. 

पोलिस महानिरीक्षक दर्जाच्या पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या पुढीलप्रमाणे)

यशस्वी यादव (सागरी सुरक्षा येथून सहपोलिस आयुक्त (वाहतूक मुंबई)

मधुकर पांडे (सहपोलिस आयुक्त मुंबई येथून सागरी सुरक्षा व विशेष सुरक्षा, मुंबई)

दीपक शिवानंद पांडे (सुधार व सेवा येथून पोलिस आयुक्त नाशिक शहर)

राजकुमार व्हटकर (सहपोलिस आयुक्त नवी मुंबई वरू सहपोलिस आयुक्त (प्रशासन मुंबई)

छेरींग दोर्जे (नाशिक परीक्षेत्र वरून सुधार व सेवा)

मनोजकुमार लोहिया (नांदेड परीक्षेत्र वरून कोल्हापूर परीक्षेत्र महानिरीक्षक)

प्रताप दिघावकर (महिला अत्याचार प्रतिबंधवरून विशेष पोलिस महानिरीक्षक नाशिक)

सुहास वारके (कोल्हापूर परीक्षेत्रवरून विशेष पोलिस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) पोलिस महासंचालक कार्यलय मुंबई)

मिलिंद भारंबे (  विशेष पोलिस महानिरीक्षक  कायदा व सुव्यवस्था, मुंबई येथून सहआयुक्त गुन्हे शाखा, मुंबई)

विश्वास नांगरे पाटील ( पोलिस आयुक्त नाशिकवरून सहपोलिस आय़ुक्त (कायदा व सुव्यवस्था, मुंबई)

कृष्णप्रकाश (प्रशासन, पोलिस महासंचालक कार्यालय येथून पोलिस आयुक्त पिंपरी-चिंचवड)

पिंपरी-चिंचवडचे विद्यमान पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई यांना प्रतिक्षा यादीत ठेवण्यात आलेले आहे.

......

संदीप पाटील गडचिरोलीत

पुणे : पुण्यात चांगले काम करणारे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांची गडचिरोलीला बदली करण्यात आली. नक्षलवाद विरोधी पथकाचे पोलिस उपमहानिरीक्षक म्हणून म्हणून त्यांना जबाबदारी सांभाळावी लागणार आहे.

पाटील यांनी पुण्यात वेगवेगळे प्रयोग राबवून जिल्ह्यातील नागरिकांची मने जिंकली होती. पुण्यात येण्याआधी त्यांनी सातारा आणि गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक म्हणूनही ठसा उमटवला होता. त्यांना परत गडचिरोलीला पाठविण्यात आल्याने आश्चर्य़ व्यक्त होत आहे.

इतर बदल्या पुढीलप्रमाणे : डॉ. जय जाधव (महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामांडळ येथून सहपोलीस आयुक्त, नवी मुंबई)

निसार तांबोळी (सिडको दक्षतावरून विशेष पोलिस महानिरीक्षक नांदेड परीक्षेत्र)

चंद्रकिशोर मीना (राज्य राखीव पोलीस बल, गट क्र. 8 वरून विशेष पोलिस महानिरीक्षक, अमरावती) 

संजय दराडे (पोलीस उपमहानिरीक्षक (विक्रीकर) वरून अपर पोलीस आयुक्त, पूर्व विभाग मुंबई) 

एस वीरेश प्रभु (अतिरिक्त पोलीस आयुक्त, मध्य विभाग वरून मुंबई अपर पोलीस आयुक्त, गुन्हे)

सत्य नारायण (उपमहानिरीक्षक, व्हीआयपी सेक्युरीटी येथून अपर आयुक्त दक्षिण विभाग मुंबई)

ज्ञानेश्वर चव्हाण (अपर पोलीस आयुक्त, (संरक्षण व सुरक्षा) येथून अपर आयुक्त, मध्यविभाग मुंबई)

नामदेव चव्हाण (पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना येथून अपर पोलिस आयुक्त उत्तर विभाग, पुणे)

श्रीमती आरतीसिंग (पोलिस अधीक्षक नाशिकवरून  आयुक्त, अमरावती शहर)

संदीप कर्णिक  (अतिरिक्त पोलिस आयुक्त, गुन्हे, येथून अतिरिक्त पोलीस आयुक्त, पश्चिम विभाग मुंबई)

एस. एच. महावरकर (अपर पोलीस आयुक्त, उत्तर विभाग येथून अतिरिक्त पोस आयुक्त नागपूर)
 
लख्मी गौतम (अपर पोलीस आयुक्त, पुर्व विभाग मुंबई येथून उपमहानिरीक्षक एसीबी, मुंबई)

वीरेंद्र मिश्रा (उपायुक्त पुणे मुख्यालय येथून अपर पोलिस आयुक्त सशस्त्र पोलीस बल, मुंबई) 

एस जयकुमार (अपर पोलीस आयुक्त, सशस्त्र पोलीस बल येथून अपर पोलिस आयुक्त मीरा-भाईंदर)

संदीप बी. पाटील (पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक येथून उपमहानिरीक्षक, गडचिरोली नागपूर परीक्षेत्र)

अमरावती क्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे, अपर पोलिस आयुक्त मुंबई निशीत मिश्रा, पुण्यातील अपर पोलिस आयुक्त सुनील फुलारी,  अमरावीचे पोलिस आयुक्त संजयकुमार बाविसकर, मुंबईचे अतिरिक्त पोलिस आयुक्त (पश्चिम विभाग) मनोज शर्मा, पोलिस उपमहानिरीक्षक गडचिरोली महादेव तांबडे यांच्या बदल्यांचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार आहेत.  

 

दाते यांच्याकडे मीरा-भाईंदर

राज्यातील आणखी काही अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून अतिरिक्त पोलिस महासंचालक (विशेष अभियान) यांची अतिरिक्त पोलिस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) या पदावर बदली झाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक आशुतोष डुंबरे यांचे राज्य गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त म्हणून बदली झाली आहे. अमितेश कुमार (सहआयुक्त राज्य गुप्तवार्ता) यांची नागपूरचे पोलिस आयुक्त बदली झाली आहे. नागपूरचे आयुक्त भूषणकुमार उपाध्याय यांची अतिरिक्त पोलिस महासंचालक वाहतूक या पदावर बदली झाली आहे. 

अतिरिक्त पोलिस महासंचालक जयजितसिंह यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागात बदली झाली आहे. मुंबईचे व्ही. के. चौबे यांचीपण अतिरिक्त पोलिस महासंचालक (लाचलुचपत) याच पदावर बढली दाखविण्यात आले आहे. नवी मुंबईचे पोलिस आयुक्त यांची अतिरिक्त पोलिस महासंचालक (प्रशिक्षण व खास पथके) येथे नियुक्ती झाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील बिपिनकुमारसिंह यांची नवी मुंबईचे पोलिस आयुक्त म्हणून बदली झाली आहे. अतिरिक्त पोलिस महासंचालक सदानंद दाते यांची मीरा-भाईंदरचे पोलिस आयुक्त म्हणून बदली झाली आहे. अतिरिक्त पोलिस महासंचालक विनय कारगावकर (वाहतूक), देवेन भारती (दहशतवादी विरोधी पथ) यांच्या बदलीचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख