पिंपरी : पिंपरी-चिंचवडचे कार्यक्षम, प्रामाणिक व धडाकेबाज पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी अवघ्या शंभर दिवसांत शहरावर मजबूत पकड बसवल्याने ते शहरवासियांच्या गळ्यातले ताईत झाले आहेत. ते दररोज दोन तास अभ्यांगतांना वेळ देत आहे. मात्र, मोठ्या गर्दीमुळे अनेकांना त्यांना भेटता येत नाही. तशी प्रेमळ तक्रार आल्यावर त्यांनी भेटीस येणाऱ्यांना आज भावनिक साद घातली.
मुंबईकरांना मिळणार "वातानुकूलित बैलगाडा!" शेलारांचा सरकारला टोला.. #PoliticsInMaharashtra #राजकीय #महाराष्ट्र #Sarkarnama #Viral #ViralNews #राजकारण #MarathiNews
https://t.co/611sQMx4Cn— Sarkarnama (@SarkarnamaNews) December 19, 2020
अडीअडचणी सोडविण्यासाठी माझ्याकडे मोठ्या आशेने येणाऱ्या कुणालाही मी निराश करणार नाही, असे त्यांनी आपल्या फेसबुक पेजवर सांगितले. "उम्मीद बडी चीज होती है, और किसीकीही उम्मीद मै तुटने नही दूंगा," असे त्यांनी ठामपणे सांगितले. भेटीसाठी वेळ लागला, तर ती न झालेल्यांनी समजावं की दुसरेही आपल्यासारखेच मोठी आशा तथा उम्मीद घेऊन भेटीस आलेले आहेत, अशी भावनिक साद त्यांनी घातली. दररोज शंभरजणांचे दुख कमी करु शकलो आणि त्यामुळे, जर पोलिसांची प्रतिमा बदलत असेल, उजळत असेल, तर सकाळी नऊ ते रात्री अकरा असे १४ तासही काम करायला माझी तयारी आहे, असे ते म्हणाले.
अगदी शहराबाहेरून म्हणजे पोलिस आय़ुक्तालय हद्दीपलीकडूनही कृष्णप्रकाश यांच्याकडे मदतीसाठी याचना होत असते. त्या स्थितीतही ते शक्य ती मदत देण्याचा प्रयत्न करतात. मोठ्या आशेने लोक येतात. एक वरिष्ठ अधिकारी म्हणून किमान त्यांचे गाऱ्हाणे ऐकून तरी मी घेऊ शकतो, असे कृष्णप्रकाश प्रांजळणे यावर सांगतात. कारण आपल्या तक्रारीचे निवारण होईल, अशी त्यांना आशा असते. भेटण्यास येणारी अशी प्रत्येक व्यक्ती ही आपला सन्मान असल्याने त्यांचे म्हणणे मी लक्षपूर्वक ऐकतो, असे ते म्हणाले.
हेही वाचा : सोनिया गांधीच्या 'लेटर बॉम्ब'मुळे ठाकरे सरकार गॅसवर..
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पत्र लिहिलं आहे. महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला निर्णयप्रक्रियेत सामावून घेतले जात नाही, निधी मिळत नाही, अशा तक्रारी आल्यानंतर सोनिया गांधी यांनी याबाबत नाराजी व्यक्त करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. राज्यातील अनुसूचित जाती जमातीच्या विकासाबाबत कारवाई करावी हा हेतू या पत्राचा विषय असला तरी काँग्रेसच्या नाराजीची योग्य दखल शिवसेना आणि राष्ट्रवादी घेत नसल्यामुळेच हे पत्र आणि दिल्लीत पत्रकार परिषद घेण्यात आली अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. यावरून भाजपचे नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

