पोलिस ठाण्यातच 'एएसआय'ने घेतली वीस हजाराची लाच

पोलिस ठाण्यातच वीस हजार रुपयांची लाच घेताना एका सहाय्यक फौजदाराला (एएसआय) पिंपरी चिंचवडमध्ये पकडण्यात आले. सांगवी पोलिस ठाण्यात हा प्रकार घडला.अशा ट्रॅपची लगेच माहिती देणाऱ्या पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) या प्रकरणात, मात्र ती विलंबाने म्हणजे दुसऱ्या दिवशी सायंकाळी दिली, हे विशेष.
पोलिस ठाण्यातच 'एएसआय'ने घेतली वीस हजाराची लाच
Bribe

पिंपरी : पोलिस ठाण्यातच वीस हजार रुपयांची लाच घेताना एका सहाय्यक फौजदाराला (एएसआय) पिंपरी चिंचवडमध्ये पकडण्यात आले. सांगवी पोलिस ठाण्यात हा प्रकार घडला.अशा ट्रॅपची लगेच माहिती देणाऱ्या पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) या प्रकरणात, मात्र ती विलंबाने म्हणजे दुसऱ्या दिवशी सायंकाळी दिली, हे विशेष.

दरम्यान, वाहतूक नियमभंगाबद्दल एका महिला दुचाकीस्वाराकडून लाच घेणाऱ्या महिला वाहतूक पोलिसाला प्रामाणिक व खमके पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी नुकतेच थेट तडकाफडकी निलंबित केले आहे. त्यामुळे या लाचखोरीच्या प्रकरणातही तशीच कारवाई होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पोलिस बंदोबस्त देण्याचे काम हे 'एएसआय'चे नसून पोलिस ठाण्यातील वरिष्ठांचे असते. त्यामुळे या प्रकरणात ते सुद्धा सहभागी तर नाही ना,अशी चर्चा आता सुरु झाली. त्यातून सांगवी पोलिस ठाण्याच्या प्रमुखांविरुद्धही नैतिक जबाबदारी म्हणून बदलीची कारवाई होऊ शकते.      

शंकर एकनाथ जाधव (वय ५६) असे या एएसआयचे नाव आहे. त्याच्या पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्धचा हा लाचखोरीचा गुन्हा झाला आहे. एका दिवाणी प्रकरणातील ताबा वॉरंटची अंमलबजावणीसाठी पोलिस बंदोबस्त देण्याकरिता जाधवने पन्नास हजार रुपयांची मागणी केली केली होती. नंतर वीस हजारावर तडजोड झाली होती.
Edited By - Amit Golwalkar

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in