गुजरातमधील 'ते' पत्र आम्ही बाहेर काढू...संजय राऊत यांचा इशारा 

गुजरातमध्ये अधिकाऱ्यांनी असं पत्र लिहिलं होतं.. तेव्हा राजीनामे का घेतले नाही,असेखासदार संजय राऊत यांनी सांगितले.
24sanjay_raut_6may_2f_0.jpg
24sanjay_raut_6may_2f_0.jpg

नवी दिल्ली : मुबंईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटरबाँम्बनंतर राज्यात विरोधकांनी आघाडी सरकारवर हल्लाबोल करीत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. याचे पडसाद काल लोकसभा आणि राज्यसभेतही उमटले आहे. यावरून सोमवारी लोकसभेत भाजप आणि शिवसेना आमदारांमध्ये खडाजंगी झाली. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी भाजपने केली आहे. यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते आज पत्रकारांशी बोलत होते. 

संजय राऊत म्हणाले की, परमबीर सिंह सुप्रीम कोर्टात जाऊन दबाव आणण्याचे काम करायचं असेल तर त्यांना सुप्रीम कोर्टात जाऊ द्या.माजी न्यायाधीश रंजन गोगाई यांनीच म्हटलं आहे की सुप्रीम कोर्टाचा वापर केला जात आहेत. संजीव भट्ट, प्रदीप शर्मा या दोन वरिष्ठ पोलिस आधिकाऱ्यांनी देखील लेटरबाँम्ब गुजरातच्या सरकारवर केले होते. आज दोन्ही अधिकाऱ्यांना जेलमध्ये टाकले आहे.

गुजरातमध्ये अधिकाऱ्यांनी असं पत्र लिहिलं होतं तेव्हा राजीनामे का घेतले नाही? असे राऊत यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.  मात्र, गुजरातमध्ये गृहमंत्र्यांना एक न्याय आणि महाराष्ट्रातील गृहमंत्र्यांना एक न्याय का दिला ? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे. अशा पांचट पत्रावर गृहमंत्री, मुख्यमंत्री यांचा राजीनामा घेतला जात नाही, गुजरातमधील पत्र आम्ही बाहेर काढू, असा इशारा राऊत यांनी विरोधकांना दिला आहे. 
 
हेही वाचा : देशमुखांवर पुन्हा बाँब : बदली रॅकेटच्या सीबीआय चौकशीची फडणवीस करणार मागणी
  
मुंबई : गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांनी बदल्यांच्या रॅकेटची जी चौकशी केली होती त्यात अनेक धक्कादायक नावे समोर आली आहेत. मुख्यमंत्र्यांकडे हा अहवाल तत्कालिन महासंचालकांनी सोपवूनही त्यावर कारवाई झालेली नाही. मी आज संध्याकाळी केंद्रीय गृहसचिवांशी याबाबत चर्चा करणार असून या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी करणार असल्याचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत जाहीर केले वरिष्ठ पोलिस अधिकारी (Mumbai Pollice) परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी गृहमंत्र्यांवर आरोप केल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) अडचणीत आले आहेत. आता फडणवीस (Devendra Fadanavis) यांनी पत्रकार परिषदेत गंभीर आरोप केल्यानंतर देशमुख यांच्या अडचणीत अजून वाढ होण्याची शक्यता आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com