आणखी दोन महापालिकांचा विस्तार होणार; २३ गावांच्या समावेशासाठी हालचाली  

महापालिकेत गावे समाविष्ट करताना जिल्हापरिषद आणि महापालिकेचा ठराव लागणार आहे.
 Vasai Virar Municipal Corporation .jpg
Vasai Virar Municipal Corporation .jpg

विरार : वसई विरार शहर (Vasai-Virar) महालिकेतून 29 गावे वगळण्याचा तिडा मुंबई उच्चन्यायालयात सुरु आहे. तसेच वसई तालूक्यातील अर्नाळा ग्रामपंचायत लोकसंख्येनुसार अर्नाळा  नगर पंचायतचा प्रस्ताव असतानाच वसई विरार शहर महापालिकेच्या विस्ताराचे वेध लागले आहेत. अर्नाळा व अर्नाळा किल्ला ग्रामपंचायतसह आणखीन 23 गावे महापालिकेत समाविष्ट करण्याच्या हालचाली सुरु झाल्याची गोपनीय माहिती हाती आली आहे. तसेच भिवण्डी महापालिकेचाही विस्तार होत असून 28 नवीन गावे समाविष्ट करण्यात येणार असल्याचे समोर येत आहे. (Villages Will included in Vasai Virar Municipal Corporation)   

वसई विरार महापालिका स्थापनेपासूनच गावे वगळण्याचा मुद्द्यावरून वादात सापडली आहे. गावे वगळण्याबाबत मुंबई उच्च न्यालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. बदलत्या राजकीय पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गावे वगळण्याबाबत अनेक वेळा भूमिका बदलली आहे. याशिवाय लोकसंख्ये नुसार अर्नाळा ग्रामपंचायतचा अर्नाळा नगर पंचायत निर्मितीचा प्रस्ताव गेले काही वर्षांपासून प्रलंबित आहे. असे असतानाच वसई विरार पालिकेच्या विस्ताराची चक्रे मंत्रालयतून फिरवली जात असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी सांगितली आहे.

पालिकेच्या विस्तारामध्ये विरार पश्चिमेतील अर्नाळा ग्रामपंचायत, अर्नाळा किल्ला, मुक्काम, कोल्हापुर, टेंभी, पाटीलपाडा, पूर्वेतील भाटपाडा, डोलीवपाडा, खैरपाडा, खार्डी, तर वसई पश्चिमेतील खोचिवडे, पाली, तर्खड, आकटन, वासलई, रानगाव, तर नालासोपारा पश्चिमेतील सत्पाळे,  कलंब, नायगाव पूर्वेतील चंद्रपाडा, मालजीपाडा, मोरी, सारजा मोरी, टिवरी, टोकरे  या गावांचा समावेश होणार असल्याचे समजते. यापूर्वी वसई तालुक्यातील ज्या ग्रामपंचायती राहिल्या आहेत त्या ठिकाणी नगरपरिषद आणि नगरपंचायती करण्याचे जवळ पास नक्की झाले होते. परंतु न्यायालयात याचिका प्रलंबित असल्याने हा निर्णय कागदावर राहिला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सह वसईतील काही नेत्यांच्या उपस्थितीत हा निर्णय झाला होता. परंतु तो नंतर मागे पडला असतानाच आता नव्याने गावे समाविष्ट करण्याचा निर्णय मंत्रालय पातळीवर घेण्याचे घट्ट असल्याचे मंत्रालय सूत्रांकडून समजते. 

दरम्यान, वसई विरार पालिकेतील गावे वगळण्याच्या मुद्दा न्यायालयात प्रलंबित असताना तसेच या प्रश्नावर तीव्र आंदोलने झाली असताना पुन्हा एकदा गावांच्या प्रश्नावर  रान पेटणार असल्याचे चित्र दिसत आहे. अगोदरच पालिकेच्या वाढीव उपभोक्ता करावरून वसई विरार नागरिकांत प्रचंड नाराजी असताना पालिकेत नवीन गावे समाविष्ट करण्यावरून तीव्र प्रतिकिया उमटण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या बाबत मंत्रालयातून अधिकृत पणे कोणतीही प्रतिक्रिया मात्र मिळू शकली नाही. 

महापालिकेत गावे समाविष्ट करताना जिल्हापरिषद आणि महापालिकेचा ठराव लागणार आहे. सद्या महापालिकेत लोकप्रतिनिधी नसल्याने हा ठराव कसा होणार असा प्रश्न विचारला जात आहे. जिल्हा परिषदेचाही गावे महापालिकेत समाविष्ट करण्यास विरोध नसल्याचा ठराव लागणार असून त्यानंतर त्यावर हरकती आणि सूचना मागविल्यानंतरच गावे महापालिकेत समाविष्ट केली जाण्याची श्यक्यता आहे.
 
भिवंडी निजामपूर महापालिकेत काल्हेर, खोणी, पुरणे, कोण, करवली, राहणाल, शेलार, दिवे अंजूर, घोळगाव गोवे, गुंडावली, कशेळी, कोपर, माणकोली, ओवाळी, पिंपळास, पिंपळगाव, पिपंळनेर राजणोली, सरवली, सवांडे, सोनाळे, कैलास नगर, ठाकूरगाव पिंपळघर, वळ, राजनगर आदी गावे समाविष्ट करण्यात येणार असल्याची खात्रीशीर माहिती आहे.

Edited By - Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com