नवी मुंबईत दोन्ही राजे एकत्र येणार 

नवी मुंबईत होणाऱ्या बैठकीला तरी उदयनराजे आणि संभाजीराजे एकत्र येणार का? याबाबतची उत्सुकता आहे.
Udayan Raje and Sambhaji Raje will come together in Navi Mumbai for the meeting of Maratha reservation
Udayan Raje and Sambhaji Raje will come together in Navi Mumbai for the meeting of Maratha reservation

मुंबई : मराठा आरक्षणासाठी राज्यभरात सुरू असलेल्या आंदोलनाबाबत रणनीती ठरवून अधिक व्यापक रूप देण्यासाठी उद्या (ता. 7 ऑक्‍टोबर) नवी मुंबईत एका राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती उदयनराजे भोसले आणि छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक होणार आहे. त्यानिमित्ताने हे दोन्ही राजे एकत्र येणार आहेत. 

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्यभरातील मराठा युवक, समाजात संतापाची भावना आहे. आरक्षण कायम राहावे, यासाठी राज्य सरकार विविध पातळ्यांवर प्रयत्न करीत आहे. आरक्षणाला दिलेली तात्पुरती स्थगिती उठवावी, यासाठी राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात विनंती अर्ज केला आहे. 

एकीकडे राज्य सरकार प्रयत्न करत असताना दुसरीकडे मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातूनही प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून उद्या (ता. 7) नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमधील माथाडी भवनात मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाबाबत बैठक होणार आहे. या बैठकीला मराठा क्रांती मोर्चाच्या विविध संघटनांचे राज्यभरातील प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. 

आरक्षण कायम राहावे, यासाठी सर्वोच्च न्यायालयात कशा प्रकारे बाजू मांडायची, याचा विविध संघटनांच्या माध्यमातून आढावा घेतला जात आहे. नाशिकमधील बैठकीला खासदार संभाजीराजे यांनीही हजेरी लावत मार्गदर्शन केले होते. 

सकल मराठा समाजाच्या वतीने कोल्हापुरात राज्यव्यापी न्यायिक परिषदही घेण्यात आली. या परिषदेला "नाबार्ड'चे माजी अध्यक्ष यशवंतराव थोरात, खासदार संभाजीराजे, मुंबई उच्च न्यायालयाचे ऍड. आशिष गायकवाड यांच्यासह विविध जिल्ह्यांतील वकील सहभागी झाले होते. 

आमदार विनायक मेटे यांनी पुण्यात मराठा विचार मंथन बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीसाठी मेटे यांनी खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना निमंत्रण दिले होते. मात्र या दोन्ही राजांनी बैठकीकडे पाठ फिरवली होती.

"उदयनराजे मला येतो म्हणाले होते. पण ते का आले नाहीत, माहिती नाही,' असे मेटे यांनी सांगितले होते. त्यामुळे उद्या (ता. 7) नवी मुंबईत होणाऱ्या बैठकीला तरी उदयनराजे आणि संभाजीराजे एकत्र येणार का? याबाबतची उत्सुकता आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com