तुकाराम मुंढे अपयशी अधिकारी : आमदार मंदा म्हात्रेंचा हल्लाबोल 

त्यांनी केलेली प्रत्येक कारवाई ही प्रसिद्धीसाठीच असते.
Tukaram Mundhe failed officer: MLA Manda Mhatre's attack
Tukaram Mundhe failed officer: MLA Manda Mhatre's attack

नवी मुंबई : राज्यातील सनदी अधिकाऱ्यांपैकी तुकाराम मुंढे हे सर्वांत अपयशी ठरलेले अधिकारी आहेत. त्यांनी केलेली प्रत्येक कारवाई ही प्रसिद्धीसाठीच असते, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबईचे तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढेंवर तोफ डागली आहे. 

मुंढे कसे आहेत, याबाबत कोणाला माहिती घ्यायची असेल, तर त्यांनी मला प्रत्यक्ष येऊन भेटावे, असे जाहीर आवाहनही म्हात्रे त्यांनी पत्रकार परिषदेत केले. 

नवी मुंबई महापालिकेने तयार केलेल्या राज्यातील पहिल्या अपंग शिक्षण आणि प्रशिक्षण केंद्राचे प्रश्‍न मांडण्यासाठी म्हात्रे यांनी एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यादरम्यान बोलताना म्हात्रे यांनी मुंढे यांचा खरपूस समाचार घेतला.

जेव्हा मुंढे नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त होते, तेव्हा त्यांची आणि माझी अनेक विषयांवर चर्चा व्हायची. चर्चेदरम्यान त्यांची भूमिका नेहमी नकारात्मकच राहिलेली आहे. यादरम्यान वाद एवढ्या विकोपाला जायचा, की ते सर्वांना फोन करून स्वतःला बंदोबस्त वगैरे मागवून घेत. जणू काही आम्ही चर्चा नाही, तर त्यांच्यावर हल्ला करायला आलो आहोत, असे म्हात्रे यांनी सांगितले. 

मुंढे राज्यातील ज्या ज्या महापालिकेत गेले, तिथे अपयशी ठरले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात ते नापास ठरलेले अधिकारी आहेत, असा दावा म्हात्रे यांनी केला. दरम्यान, सरकारने केंद्राऐवजी शाळा असे परिपत्रक काढल्यामुळे ज्या केंद्राला वाचवण्यासाठी मुंढेंनी आटापिटा केला होता, त्यांना चपराक बसल्याचा पुनरुच्चारही म्हात्रे यांनी केला. 

मुंढेंना ब्रेकिंग न्यूज हवी असायची 

मुंढे नेहमी प्रसिद्धीत राहण्याचा प्रयत्न करतात. एक कर्मचारीही निलंबित केला, तरी त्यांना ब्रेकिंग न्यूज हवी असते. त्यामुळे ते ज्या पालिकेत गेले तिकडे अपयशी ठरले आहेत. वॉक विथ कमिशनरमध्ये मुंढेंकडे नागरिकांनी मागणी केलेल्या कामांना पूर्णत्वास नेले नाही. समाजमाध्यमांवर एखादे समूह तयार करायचे, स्वतःवर फुले टाकायला लोकांना सांगायचे, निवडक लोकांना सोबत घेऊन स्वतःचे कौतुक करून घ्यायचे, असा आरोपही म्हात्रे यांनी मुंढेंवर केला. 

लोकप्रतिनिधीकडे पाहण्याच्या दृष्टीकोनाबद्दल सुनावले 

लोकप्रतिनिधींना एकाच चष्म्यातून पाहायचे. त्यांना सर्व लोकप्रतिनिधी चोर वाटतात. एकदा त्यांना तुमच्या डोळ्यावर लावलेला काळा चष्मा बदलवून घ्या, त्याऐवजी सफेद चष्म्यातून आमच्याकडे पाहा; मग समजेल तुम्हाला लोकप्रतिनिधी कोण आहेत ते, असेही एकदा त्यांना सुनावल्याचे म्हात्रे म्हणाल्या. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com