तहसीलदाराने लाच म्हणून फार्म हाऊस मधील रस्ता बनवून घेतला...

पालघर नायब तहसीलदार पदाचा पदभार असलेल्या चंद्रकांत के. पवार यांना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने पकडले आहे.
Pawar-F.
Pawar-F.

पालघऱ : विक्रमगड नगरपंचायतीच्या मुख्यअधिकारी पदाचा शुक्रवारी पदभार स्वीकारलेले व पालघर नायब तहसीलदार पदाचा पदभार असलेल्या चंद्रकांत के. पवार यांना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने पकडले आहे.

विक्रमगड कोंदे (टोपले पाडा) या त्यांच्या मूळ गावी रविवारी सायंकाळी लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे निरीक्षक विलास मते यांच्या नेतृत्वाखालील ठाणे पथकाने त्यांना पकडले. विक्रमगड नगरपंचायतीचा पदभार स्वीकारण्यापूर्वी ते पालघर उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात नायब तहसीलदारपदी कार्यरत होते. 

कोंदे या गावांमध्ये असलेल्या यांच्या फार्म हाऊसमधील अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण करून देण्यासाठी त्यांची मागणी होती. संबंधित ठेकेदाराने हा रस्ता पाच फुटांच्या ऐवजी तीन फूट रुंदीचा व कमी अंतराचा केल्याबद्दल चंद्रकांत पवार यांची नाराजी होती. संबंधित ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे त्यांची तक्रार केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून त्यांना पकडले होते. याविषयी विक्रमगड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 

हेही वाचा : सुशांत सिंह याची आत्महत्या की अप्रत्यक्ष हत्या..?
 
मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने नैराश्यातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे, पण सुशांतच्या आत्महत्येमागे चित्रपट क्षेत्रातील व्यावसायिक अपयश असल्याचेही बोलले जाते.  याबाबत अनेक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुशांतचे काही चित्रपट हिट ठरले होते, पण त्यानंतरही त्यांच्या हातात मोठ्या बॅनरचा एकही चित्रपट नव्हता.  'छिछोरे' सारखा त्यांचा शेवटचा सिनेमा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. तरीही या मुंबईच्या माया नगरीमधील अनेक मोठ्या बॅनर, निर्मात्यांनी त्यांच्यावर कळतनकळत बहिष्कार टाकला होता.

सुशांत हा अभिनेता शाहरूख खान आणि अक्षयकुमार सारखा  या बॅालिवुडमध्ये 'आऊटसाईडर' होता. बॅालिवुडमधील काही कळप त्याला चित्रपट मिळू नये म्हणून सारखे प्रयत्नशील असायचे, अशीच सध्या चर्चा आहे. सुशांतने आत्महत्या केली नसून त्यांची हत्या झाली असल्याचे त्यांच्या मामांनी आज प्रसारमाध्यमांसमोर बोलतांना सांगितले.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com