तो आदेश मी दिल्याचे सिद्ध झाल्यास राजकीय संन्यास घेईन!   

तो केवळ योगायोग समजावा!
 Uday Samant .jpg
Uday Samant .jpg

सिंधुदुर्ग : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि शिवसेना यांच्यामध्ये सध्या जोरदार संघर्ष सुरु आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रशासनाने जमाव बंदीचे आदेश लागू केले आहेत. त्यावरुन भाजने राज्य सरकारवर टीका केली आहे. नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा रोखण्यासाठी जमाव बंदी लागू केल्याचे भाजपने म्हटले आहे. यावर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत  (Uday Samant) यांनी स्पष्टीकरण दिले आहे. (Uday Samant said about Narayan Rane's Jana Aashirwad Yatra) 

यावेळी सामंत म्हणाले की, राणे यांच्या यात्रेमुळे मी जमाव बंदीचे आदेश दिले असे सिद्ध झाल्यास राजकारणातून संन्यास घेईन, असे सामंत यांनी जाहीर केले. सामंत देखील आज रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. कोणाचा तरी दौरा आहे त्यामुळे मी रत्नागिरी दौऱ्यावर आहे. असे काही नाही, तो केवळ योगायोग समजावा. तीन दिवस मी रत्नागिरी जिल्ह्यात आहे. जनआशीर्वाद यात्रेच्या वेळापत्रकाला अनुसरून आम्ही दौरे लावलेले नाहीत, असेही सामंत यांनी सांगितले. 

जी कारवाई झाली ती कायदेशीर होती. प्रत्येकाला त्यांचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. मात्र, पक्ष वाढवत असतांना प्रत्येकाला प्रत्येकाच्या नेत्याचा अभिमान असतो. तसा आम्हाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत अभिमान आहे. गर्व देखील आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून अतिशय चांगल काम करत आहेत. कदाचित देशाच्या क्रमवारीत पहिल्या पाच क्रमांकामध्ये ते आल्यामुळे काही लोकांना आवडले नसेल, असे सामंत म्हणाले.

जिल्हाधिकाऱ्यांना स्वायत: अधिकार आहेत ते प्रशासनाचे प्रमुख आहेत. जिल्हादंडाधिकारी देखील आहे, त्यांना वाटले असेल की कलम १४४ सिंधुदुर्गमध्ये लावणे आवश्यक आहे. गणपतीच्या पार्श्वभूमिवर असेल किंवा अन्य कोणत्या पार्श्वभूमिवर असेल, असेही सामंत यांनी सांगितले.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com