माध्यमांनी रियाचा पाठलाग करू नये...उच्च न्यायालयाची सूचना  - Riya Chakraborty granted bail .. Police should not chase Riya | Politics Marathi News - Sarkarnama

माध्यमांनी रियाचा पाठलाग करू नये...उच्च न्यायालयाची सूचना 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 7 ऑक्टोबर 2020

रिया चक्रवर्तीला उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. पण तिचा भाऊ शैाविक आणि अब्दुल बासित परिहार याचा जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळला आहे.

मुंबई  : अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणात सुशांतची मैत्रिण अभिनेत्री रिया चक्रवर्तीला उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. रियाच्या विरोधात ठोस पुरावे नसल्याने रियाला जामीन मंजूर करण्यात आला आहे. 1 लाख रूपयाच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे.

रिया चक्रवर्तीचा पासपोर्ट जमा करण्यात आला आहे. तिला मुंबई सोडून न जाण्याचे सांगितलं आहे. माध्यमांनी रियाचा पाठलाग करू नये, नियम तोडून पाठलाग केल्यास कारवाई करण्यात येईल, अशी सूचना न्यायालयानं मुंबई पोलिसांना दिली आहे.    

पण तिचा भाऊ शैाविक आणि अब्दुल बासित परिहार याचा जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळला आहे. तर याप्रकरणातील अन्य आरोपी सॅम्युअल मिंराडा, दीपक सावंत यांचाही जामीन अर्ज न्यायालयानं मंजूर केला आहे.  

सुशांत हा 14 जूनला मुंबईतील घरी मृतावस्थेत सापडला होता. याचा तपास मुंबई पोलिस करीत होते. या प्रकरणी पोलिसांनी 56 जणांचे जबाब नोंदविले होते. यात सुशांतचे कुटुंबीय, त्याचे मित्र, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांच्यासह इतर काही जणांचा समावेश होता.   

सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्जच्या अँगलचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्तीला चौकशीनंतर अटक केली होती. रियाला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले होते.

एनसीबीने तिला न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी केली होती. न्यायालयाने रियाची जामिनाची मागणी फेटाळून तिला 14 दिवसांचा न्यायालयीन कोठडी दिली होती. . तिच्यावर अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा (एनडीपीएस) कलम 8 (सी), 20 (बी), 28 आणि 29 नुसार ड्रग्जचे खरेदी, सेवन, बाळगणे आदी आरोप तिच्यावर ठेवण्यात आले आहेत. 
 
सुशांतसिंह राजपूत याचा मृतदेह पाहण्यासाठी रिया चक्रवर्ती मुंबई महापालिकेच्या डॉ. आर.एन.कूपर रुग्णालयाच्या शवागारात गेली होती, असा दावा करण्यात आला होता. यावरुन मोठा गदारोळ उडाला होता. तसेच, तिने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला असेल, असा आरोपही करण्यात आला होता. या प्रकरणी महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाने कूपर रुग्णालयासह मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली होती.

सुशांतच्या घरी काम करणाऱ्या दीपेश सावंत याला एनसीबीने आधी अटक केली होती. दीपेश हा ड्रग्जची खरेदी आणि हाताळणी करीत होता. तो सुशांतला ड्रग्ज आणून देत होता. 'एनसीबी'ने या प्रकरणात सुरुवातीला कायझेन इब्राहिम, झैद विलाट्रा, अब्बास लखानी, अब्दुल बसित परिहार यांना अटक केली होती. हे सर्वजण ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभागी होते. त्यांच्याकडून अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिचा भाऊ शौविक आणि सुशांतचा मॅनेजर सॅम्युएल मिरांडा हे ड्रग्ज खरेदी करीत होते. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली होती. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख