कसारा घाटात दरड कोसळली! रेल्वे सेवा विस्कळीत

काल रात्री सोलापूरहून मुंबईकडे निघालेली सिद्धेश्वर एक्सप्रेस आज सकाळी बदलापूर जवळ येऊन थांबली आहे.
Railway services disrupted due to heavy rains .jpg
Railway services disrupted due to heavy rains .jpg

लोणावळा : मुंबईसह ( Mumbai) राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस सुरु आहे. चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाचा जोर कायम आहे. अनेक ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. दरड कोसळल्याने रेल्वे रुळाचे मोठे नुकसान झाले. जोरदार पावसाणुळे अंबरनाथ ते कर्जत, लोणावळा (heavy rains in Lonavla) दरम्यानची रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या. (Railway services disrupted due to heavy rains) 

लोणावळा खंडाळा येथे देखील ढगफुटी सदृश्य पाऊस झाला असून तीन तासात 150 ते 175 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. अनेक घरांमध्ये पाणी घुसले असून काही ठिकाणी शेती पिके वाहून गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच दरड कोसळण्याच्याही घटना घडल्या आहेत. गेल्या दहा तासापासून मुंबई- नागपूर दुरांतो एक्सप्रेस इगतपुरी पासून 18 किलोमीटर आधी उभी आहे. त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. मुंबई-नाशिक रेल्वे मार्गावर बुधवारी रात्री १० च्या सुमारास कसारा घाटात दरड कोसळली आहे, त्यामुळे मुंबईहून नाशिककडे जाणाऱ्या गाड्या खोळंबल्या आहेत, दरड हटविण्याचे काम सुरु आहे, रात्री पावसाचा जोर कायम होता, त्यामुळे दरड हटविण्यात अडथळे येत होते. 

मध्य रेल्वेवरील टिटवाळा ते इगतपुरी आणि अंबरनाथ ते लोणावळा लोकलला सेवा ठप्प आहे. काल रात्री सोलापूरहून मुंबईकडे निघालेली सिद्धेश्वर एक्सप्रेस आज सकाळी बदलापूर जवळ येऊन थांबली आहे. रेल्वे मार्गावर पाच फुटापर्यंत पाणी असल्यामुळे गाडी थांबवण्यात आली आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाच्या वतीने कोणत्याही सुचना नसल्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.  

दरड कोसळल्यामुळे अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. हवामान विभाने मुंबईसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. मुंबईत जोरदार पावसाचा अंदाज आहे. आधी मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता, मात्र नंतर रेड अलर्ट देण्यात आला. मुंबईसह पुणे, पालघर, नाशिक, रायगड आणि विदर्भातील अनेक ठिकाणीही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. 

Edited By - Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com