एकनाथ शिंदेंचा राष्ट्रवादीला धोबीपछाड; विरोधी पक्षनेतेपदाला स्थगिती

विरोधी पक्षनेते पदाची करण्यात आलेली नियुक्ती बेकायदेशीर आहे, अशी तक्रार ज्येष्ठ नगरसेवक जावेद दळवी यांनी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे केली होती.
Eknath Shinde .jpg
Eknath Shinde .jpg

भिवंडी : भिवंडी महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण महासभेत महापौरांनी विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील झालेले मतलुब ( सरदार )अ. खान यांची नियुक्ती केली होती. विरोधी पक्षनेते पदाची करण्यात आलेली नियुक्ती बेकायदेशीर आहे, अशी तक्रार ज्येष्ठ नगरसेवक जावेद दळवी यांनी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे केली होती. त्यांमुळे नगरविकास विभागाने यांची गंभीर दखल घेऊन मंत्री शिंदे यांच्या आदेशानुसार खान यांच्या विरोधी पक्षनेते पदाच्या नियुक्तीला महापालिका आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनी स्थगिती दिली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जोरदार धक्का बसला आहे.

भिवंडी महापालिकेत 47 नगरसेवक असल्याने काँग्रेसची एकहाती सत्ता होती. मात्र काँग्रेस पक्षाच्या 18 नगरसेवकांनी महापौर पदाच्या निवडणुकीत कोणार्क विकास आघाडीस पाठिंबा दिला. तेव्हा पासून भिवंडी शहरातील राजकीय वातावरण तापलेले आहे. त्यानंतर गेल्या महिन्यात या काँग्रेसच्या 18 नगरसेवकांनी राष्ट्र्वादीत प्रवेश केल्यामुळे आणखी राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. 

कोनार्क विकास आघाडीच्यावतीने मनपात भाजपकडे असलेले विरोधी पक्षनेतेपद काढून ते राष्ट्रवादी गटाकडे सुपूर्द केल्यामुळे महापौरांनी महासभेत केलेली विरोधी पक्षनेते पदाची नियुक्ती बेकायदेशीर आहे. अशी, तक्रार काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे केल्यानंतर नगरविकास मंत्र्यांच्या आदेशाने महापालिका आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनी विरोधी पक्षनेते पदास स्थगिती दिली आहे. त्यामुळे आता विरोधी पक्षनेते पदावरून चांगलेच राजकारण तापले आहे. 

त्यामुळे पुनर्नियुक्तीसाठी आता राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी वरिष्ठांकडे धाव घेतली असून त्यासाठी वरिष्ठांच्या भेटीगाठी सुरु केल्या आहेत. तर, महापौरांनी पुन्हा विरोधी पक्षनेतेपद भाजपकडे द्यावे, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते नगरसेवक यशवंत टावरे यांनी केली आहे.

Edited By - Amol Jaybhaye 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com