भाजप नगरसेवकांना फोडण्यासाठी पोलिसांचा दबाव : दरेकर

भाजपच्या नगरसेवकांची जुने प्रकरण काढून त्यांना अडकवण्यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते सक्रिय झाले, असून त्यामुळे भाजप नगरसेवकांवर दबाव आणला जात आहे.
Praveen Darekar, Bipin Kumar
Praveen Darekar, Bipin Kumar

नवी मुंबई :  नवी मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वीच फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले आहे. भाजपच्या नगरसेवकांविरोधात पोलीस बळाचा वापर करण्यात येत आहे, असा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंग यांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.  

महानगरपालिकेच्या निवडणुका जसजस्या जवळ येत आहेत. तसे शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. आरोप-प्रत्यरोपांनी शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

महापालिका निवडणुकीपूर्वीच फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले आहे. भाजपच्या नगरसेवकांविरोधात पोलीस बळाचा वापर करण्यात येत आहे. पोलिसांनी सरकारच्या दबावाखाली काम करू नये, असे आवाहन दरेकर यांनी केले. नगरसेवाकांविरोधात साम, दाम, दंड आणि भेदाचा वापर केला जात असल्याचे दरेकर यांनी पोलीस आयुक्तांना सांगितलं.

भाजपच्या नगरसेवकांची जुने प्रकरण काढून त्यांना अडकवण्यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते सक्रिय झाले, असून त्यामुळे भाजप नगरसेवकांवर दबाव आणला जात आहे. दरेकर यांनी अप्रत्यक्ष पणे, ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता पडद्यामागून हे सर्व राजकारण करत असल्याचा आरोप केला. 

शहरात भयाचे वातावरण आहे. येथील वातावरण गढूळ झाले आहे. नगरसेवक आणि नागरिकांमध्ये भय निर्माण होऊ नये ही पोलिसांची जबाबदारी आहे. त्यानुषंगाने पोलिसांनी पावले उचलवीत, असं सांगतानाच पोलिसांनी दुटप्पी भूमिका घेऊ नये. सरकारच्या दबावाखाली काम करू नये, असे आवाहनही त्यांनी पोलिसांना केले.

दरम्यान, महापालिका निवडणुकीपूर्वीच शहरात प्रचंड राजकीय घडामोडी घडत आहेत. गेल्या पंधरा दिवसात भाजपच्या पाच नगरसेवकांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली. त्यापैकी तीन नगरसेवकांनी शिवसेनेत आणि दोन नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे भाजपमध्ये खळबळ उडाली आहे.

भाजप नेते गणेश नाईक यांच्या वर्चस्वाला हा धक्का असल्याचे मानले जात होते. नगरसेवकांनी बंड केल्याने नाईकही सक्रिय झाले असून त्यांनी भाजपमधून गेलेल्यांना नांदा सौख्य भरे म्हणत टोला लगावला आहे. त्याच पार्श्वभूमीवर दरेकर यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतल्याचे बोलले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com