राणेंची जन आशीर्वाद यात्रा पुन्हा सुरु; शिवसेना म्हणते..डिवचण्याचा प्रयत्न केल्यास प्रत्युत्तर देणार

शिवसेना आणि भाजपचा संघर्ष तीव्र होऊ नये यासाठी रत्नागिरी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे.
 Narayan Rane's Jan Ashirwad Yatra begins .jpg
Narayan Rane's Jan Ashirwad Yatra begins .jpg

रत्नागिरी : केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या अटक नाट्यानंतर आज जन आशीर्वाद यात्रेचा रथ कोकणात आली आहे. राणे यांची तोफ धडाडणार की शांत बसणार आता याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. त्यातच आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न केला तर आम्ही नक्कीच प्रत्युत्तर देऊ असा आक्रमक पवित्रा शिवसेनेने घेतला आहे. (Narayan Rane's Jan Ashirwad Yatra begins) 

नारायण राणे रत्नागिरीत विमानतळावर पोहोचले आहेत. राणे यांचे स्वागत करण्यासाठी निलेश राणे, नितेश राणे हे विमानतळावर दाखल झाले आहेत. भाजपचे नेते आशिष शेलार हे राणे यांच्या सोबत आहेत. त्याचबरोबर आमदार प्रसाद लाड ही यात्रेत ‌सहभागी होणार आहेत. 

शिवसेना आणि भाजपचा संघर्ष तीव्र होऊ नये यासाठी रत्नागिरी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे. नियोजित वेळेनुसार रत्नागिरीत राणे यांचे विमान दाखल झाले. त्नागिरीत ढोल ताशाच्या गजरात नारायण राणे यांचे जंगी स्वागत भाजप कडून करण्यात येत आहे. कार्यकर्ते हळू हळू जुना हनुमान मंदिर जवळ दाखल होत आहेत. येथूनच राणे यांची जनाशीर्वाद यात्रा सुरू होणार आहे. ही यात्रा सुरू असताना कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटाही रत्नागिरीत तैनात करण्यात आला आहे.

दिवसभर राणे रत्नागिरीत असणार आहेत. दुपारी ते पत्रकार परिषदेत घेणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी एका कार्यक्रमात बोलताना राणे यांना 'व्हायरस' ची उपमा देत टोला लगावला होता. यावर राणे काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com