अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी मुंबई पोलिसांच्या ताब्यात...

गजाली फायरिंग प्रकरणात बेंगळुरू न्यायालयाने रवी पुजारीचा ताबा मुंबई पोलिसांना दिला आहे.
ravi21.jpg
ravi21.jpg

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी मुंबई पोलीसांच्या येणार असून त्यांची पोलिस कोठडी मिळविण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. गजाली फायरिंग प्रकरणात बेंगळुरू न्यायालयाने रवी पुजारीचा ताबा मुंबई पोलिसांना दिला आहे. 

मुंबईचे सहपोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी ही माहिती दिली.  रवी पुजारी पुढच्या आठवड्यात केव्हाही मुंबईत आणले जाणार आहे. कर्नाटक पोलीस पुजारीला मुंबई पोलिसांच्या हवाली करणार आहेत. ९० पेक्षा अधिक गुन्हे कर्नाटकमध्ये दाखल असल्याने भारतात आणल्यानंतर त्याचा ताबा प्रथम कर्नाटक पोलिसांना देण्यात आला. पुजारीच्या चौकशीत अनेक गंभीर गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे.


2016 मध्ये झालेल्या गजाली फायरिंग प्रकरणात मुंबई पोलिसांत रवी पुजारी हवा होता. त्यांच्याविरुद्ध देशभरात अनेक गुन्हे दाखल आहेत. रवी पुजारीवर महाराष्ट्रात 49 गुन्हे दाखल आहेत. यातील 26 गुन्ह्यात त्यांच्यावर मोकाअंतर्गत कारवाई करण्याचा गुन्हा दाखल झाला आहे. परदेशात बसून रवी पुजारी आपल्या हस्तकांमार्फत भारतामध्ये टोळी चालवत होता. 

दोन वर्षांपूर्वी दक्षिण आफिकेतून प्रत्यार्पण करून रवी पुजारी भारतात आणले आहे. त्यांचा ताबा मिळविण्यासाठी मुंबई पोलिस प्रयत्नशील होते. बंगळुरू येथील न्यायालयाने कोठडी मंजूर केल्यामुळे गुन्हे शाखेचे पथक कर्नाटक पोलिसांकडून ताबा घेऊन त्याला सोमवारी मुंबईत आणण्याची शक्यता आहे. २०१६ मध्ये विलेपार्लेच्या गजाली हॉटेलबाहेर खंडणीसाठी गोळीबार करण्यात आला होता. यात रवी पुजारीचा सहभाग असल्याचा आरोप आहे. अनेक मोठ्या आणि सेलिब्रेटींना रवी पुजारीने खंडणीसाठी धमकावले आहे. त्याचा ताबा मिळाल्याने अनेक गुंतागुंतीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.  


हेही वाचा : 'आर्ची'मुळे 'सैराट' झालेल्या सहा जणांवर गुन्हा..
नांदेड : नांदेडमध्ये 'आर्ची'ला कार्यक्रमाला बोलावणं संयोजकाला चांगलचं महाग पडलयं. संयोजकांच्या विरोधात कोव्हीड 19 च्या नियमांचे पालन न केल्याप्रकरणी काल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किनवट तालुक्यातील सारखणी इथं 16 फेब्रुवारीला संत सेवालाल जयंती निमित्त आयोजित लेंगी स्पर्धैसाठी 'सैराट' फेम 'आर्ची' उर्फ रिंकु राजगुरूला निमंत्रित करण्यात आलं होतं. रिंकुला पाहण्यासाठी कार्यक्रमाला गर्दी जमली होती. तिला पाहण्यासाठी नागरिकांनी कोरोनाची सगळी बंधने झुगारून गर्दी केली. लेंगी महोत्सवात अक्षरशः झुंबड उडाली होती. आयोजकांनाही रिंकूच्या सुरक्षेसाठी अधिक धावपळ करावी लागली. कोरोना रुग्णांच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली. या प्रकरणी संयोजक विशाल जाधवसह 6 जणांच्याविरोधात सिंदखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com