नवी मुंबईतील आरोग्य यंत्रणा 8 दिवसांत न सुधारल्यास भाजपचे आंदोलन

अनिल गोटे यांनी आज देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करणारे पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. त्या पत्राला आपण किंमत देत नसल्याचे दरेकर यांनी स्पष्ट केले आहे.
 mlc pravin darekar
mlc pravin darekar

नवी मुंबई: नवी मुंबईतील आरोग्य यंत्रणा 8 दिवसात न सुधारल्यास भाजप आंदोलन करणार असल्याचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सांगितले. 

नवी मुंबईतील कोरोना रूग्णांची संख्या साडेपाच हजाराच्या वर गेली असून मृत्यूचे प्रमाणही 200 च्या घरात पोचले आहे. यापार्श्वभुमीवर प्रविण दरेकर यांनी आज आयुक्त आण्णासाहेब मिसाळ यांची भेट घेत आरोग्य यंत्रणा सुधारण्याबाबत चर्चा केली. यावेळी नवी मुंबईतील भाजपा आमदार गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे उपस्थित होते. नवी मुंबईत कोरोना हॉस्पीटल उभा केले असले तरी प्रत्यक्ष काम करण्यासाठी डॉक्टर, नर्स उपलब्ध नाहीत. व्हेंटिलेटर, ऑक्सीजन यंत्रणा लावलेली नाही. यामुळे रूग्णांवर योग्य ते उपचार होत नसल्याने रूग्णांचे मृत्यू वाढले असल्याचा आरोप दरेकर यांनी केला. 

येत्या आठवड्यात येथील आरोग्य यंत्रणा न सुधारल्यास भाजपा रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा दिला आहे. कोरोनाचे उपचार घेताना आवश्यक असलेले ४० हजार रूपयांच्या इंजेक्शनचा खर्च पालिकेने उचलावा अशी मागणी आयुक्तांकडे करण्यात आली आहे. आयुक्तांच्या बदलीचा खेळखंडोबा सरकार करीत असून संबंधीत भागातील पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी दरेकर यांनी केली. 

जतमधील राष्ट्रवादीच्या नगरसेवकाने केला पडळकरांचा सत्कार

जत (सांगली): शरद पवारांवरील वादग्रस्त विधानामुळे चर्चित असलेले भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज जतचा दौरा केला. या दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक टिमू एडके यांनी त्यांचा सत्कार केला. 

पवारांवरील टिकेमुळे राष्ट्रवादी पडळकरांवर तुटून पडलेली असताना जतमधील राष्ट्रवादीचा नगरसेवकाने सत्कार केला आहे. महत्वाची बाब म्हणजे पडळकरांचा सत्कार करणारे नगरसेवक एडके हे धनगर समाजातून येतात. गेल्या काही दिवसांपासून ते पडळकरांना पूरक भुमिका घेत आहेत.

सुरवातीला माजी आमदार विलासराव जगताप यांच्या कार्यालयात पडळकरांचा सत्कार झाला. यावेळी भाजपचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर एडके यांच्या घरी पडळकर यांनी भेट दिली. तिथे त्यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान, इस्लामपूर (ता. वाळवा) येथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी पडळकरांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com