NIAने सचिन वाझेला घडवली लोकलवारी.. - Mansukh Hiren Crime scene recreated by NIA, Wazes journey from CST to Kalva | Politics Marathi News - Sarkarnama

NIAने सचिन वाझेला घडवली लोकलवारी..

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 7 एप्रिल 2021

सचिन वाझेला राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) काल रात्री लोकलवारी घडवली.

मुंबई : अँटिलिया बाँब प्रकरण (Antilia Bomb Case) आणि मनसुख हिरेन (Mansukh Hiren) हत्या प्रकरणात एनआयएच्या अटकेत असलेला निलंबित सहाय्यक पोलिस निरिक्षक सचिन वाझेला राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) काल रात्री लोकलवारी घडवली. रात्री सव्वाअकरा ते दोन वाजेपर्यंत त्याची कारवाई सुरू होती.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळील सापडलेली स्फोटकांची गाडी आणि मनसुख हिरने यांच्या मृत्यूचा तपास राष्ट्रीय तपाय यंत्रणा करीत आहे. मनसुख हिरेन हत्येच्या दिवशी ४ मार्चच्या रात्रीचा सर्व घटनाक्रमाचा एनआयएने उलगडा केला आहे. काल  हिरेन मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझेची सीएसएमटी ते कळवा लोकलवारी  एनआयएने घडविली. एनआयएनने सीआययूच्या कार्यालयापासून हत्या करून परत मुंबईत येईपर्यंतच्या वाझेच्या गुन्ह्याच्या कृत्याचे नाट्यरूपांतर  (क्राइम सीन रिक्रिएट) केले.   ठाण्यातील व्यावसायिक मनसुख हिरेन यांची ४ मार्चला हत्या झाली आहे.
  

मनसुख हिरेन यांची हत्या करण्यासाठी सचिन वाझे याने लोकलने प्रवास केल्याचे उघड झाले आहे. लोकलच्या गर्दीत ओळख पटणं कठीण असल्याने वाझे याने मोबाईल ऑफिसमध्ये ठेवून ठाण्याला लोकलने गेल्याचे तपासात समोर आले आहे. मुंबईच्या सीएसएमटी स्टेशनसमोरील जीपीओलगतच्या सिग्नलवरील सीसीटीव्ही यंत्रणेत तो कैद झाला आहे.लोकेशन ट्रेस होऊ नये; म्हणून वाझे याने हे मोबाइल कार्यालयात ठेवून एका मित्राला तो उचलण्यासाठीही सांगितले होते. जर कोणाचा फोन आल्यास साहेब कामात असल्याचा मेसेज देण्यास त्याला सांगण्यात आले होते. 

वाझे हा सीएसएमटी रेल्वे स्थानकाबाहेर सातच्या सुमारास सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. त्यानंतर तो ठाणे स्थानकाबाहेर दिसला आहे. पुन्हा लोकलनेच प्रवास करून तो भायखळाला उतरून बारवर रेड करण्यासाठी गेला होता. ज्यावेळी त्याने सहकाऱ्यांसोबत त्याचा मोबाइल घेऊन आणण्यास सांगितले. ज्यामुळे ते सर्वजण एका लोकेशन एकत्र दिसतील आणि वाझे याच्यावर कुणाला संशयही येणार नाही. 

राष्ट्रीय तपास यंत्रणेने मात्र मनसुख हिरेन हत्या प्रकरणात कुणा कुणाचा सहभाग आहे. त्या दिवशी कोण कोण घटनास्थळी होत. वाझेचा रोल त्यात काय, याचा तपास  एनआयए करत आहे. हिरेन यांची हत्या ही गायमुख जवळील परिसरात केल्यानंतर त्यांचा मृतदेह हा मुंब्रा खाडी परिसरात टाकण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, शवविच्छेदन अहवालात त्यांचा मृत्यू हा बुडून झाल्याचे म्हटलेले आहे. 

शवविच्छेदनाच्या या अहवालामुळे शवविच्छेदन करणारे डॉक्टरही आता रडारवर आहेत. गंभीर गुन्ह्यातील हिरेन हे संशयित व्यक्ती असताना त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करताना व्हिडिओ रेकॉर्डिंग का केले नाही. शवविच्छेदनावेळी डॉक्टरांनी वाझे याची भेट का घेतली. नेमकी त्यांच्यात काय चर्चा झाली. याची माहिती NIA घेत आहे.
Edited by: Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख