पवारांवर टीका करण्याआधी तुम्ही काय दिवे लावले ते पाहा : बोंडेंना राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर

कृषी विधेयकाच्या निमित्ताने राज्याचे माजी कृषीमंत्री सध्या राष्ट्रवादीवर तुटून पडत आहेत.
sharad pawar.jpg
sharad pawar.jpg

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करण्याऐवजी तुम्ही कृषीमंत्री असताना काय दिवे लावले: ते आधी पाहावे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी अनिल बोंडे यांचा समाचार घेतला आहे.

शरद पवारसाहेबांवर टीका करणार्‍या माजी मंत्री अनिल बोंडे यांना तपासे यांनी प्रत्युत्तर दिले. केंद्राने मंजूर केलेल्या कृषी कायद्यच्या निमित्ताने बोंडे हे राज्यभर फिरत आहेत. भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्षपद त्यांच्याकडे आहे. त्यात ते राष्ट्रवादीवर आणि शरद पवारांवर टीका करत आहेत. त्या टिकेला राष्ट्रवादीने प्रत्युत्तर दिले आहे.

पवारसाहेब देशाचे कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांची कर्जमाफी एका झटक्यात केली होती. तुम्ही मात्र तत्वत: आणि नियम अटी टाकून शेतकर्‍यांना झुंजवत राहिलात. तुमच्या प्रदेशाध्यक्षांना पवारसाहेबांवर पीएचडी करायला जमलं नाही तर तुम्हाला  पवार साहेब समजायला सात जन्म घ्यावे लागतील, असा इशाराही महेश तपासे यांनी दिला आहे.

तुम्ही भाजपाच्या सत्तेत कृषीमंत्री होतात मग शेतकर्‍यांना काय दिलात याचे आत्मपरीक्षण करावे आणि नंतर लोकनेत्यावर बोलण्याचे धाडस करावे अशा शब्दात महेश तपासे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

राष्ट्रवादीच्या चार मंत्र्यांचा मंगळवारी जनता दरबार

अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे उद्या, मंगळवार दि. १३ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी ११ ते १२ या वेळेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी जनता दरबार उपक्रमास उपस्थित राहतील.

राज्यमंत्री नामदार संजय बनसोडे हे मंगळवार दि. १३ ऑक्टोबर २०२० रोजी दुपारी २ ते ४ या वेळेत, सहकार व पणन मंत्री नामदार बाळासाहेब पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे मंगळवार दि.१३ ऑक्टोबर २०२० रोजी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी जनता दरबार  उपक्रमास उपस्थित राहतील.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com