माजी नगरसेवक भोलानाथ ठाकूर यांची आत्महत्या

भोलानाथ ठाकूर हे नवी मुंबई महानगर पालिकेच्या प्रभाग क्र. १ चे माजी नगरसेवक होते.
takur21.jpg
takur21.jpg

नवी मुंबई : दिघा येथील माजी नगरसेवक भोलानाथ  ठाकूर यांनी कळवा येथील आनंद निवास मध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना आज  घडली आहे. नवी मुंबई महानगर पालिकेच्या प्रभाग क्र. १ चे ते माजी नगरसेवक होते.  

भोलानाथ ठाकूर हे दिघ्यामधील आनंदनगर येथे वास्तव्यास होते. नाईक समर्थक गणले जाणारे भोलानाथ ठाकूर यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत आल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता. परंतु त्यांच्या आत्महत्येमुळे संपूर्ण नवी मुंबईकरांना धक्का बसला आहे. दिघा विभागात शोककळा पसरली आहे. कळवा पोलीस अधिक तपास करत आहेत.


हेही वाचा : महापालिका निवडणूक एकत्र लढविणार : संजय राऊत 

पुणे : "महापालिका निवडणूक एकत्र लढण्याचा फायदा सत्ता स्थापनेसाठी होईल, पुणे व इतर महापालिका निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढतीलच पण, काँग्रेसलाही यात सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न केले जातील," असे खासदार संजय राऊत यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत सांगितले. 

संजय राऊत म्हणाले की, ज्या शहरात ज्या पक्षाची ताकद जास्त असेल, त्या पक्षाच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविली जाईल. पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरात राष्ट्रवादीची ताकद जास्त आहे. त्यामुळे त्या ठिकाणी राष्ट्रवादीला संधी मिळेल. सत्ता परिवर्तनासाठी एकत्र लढणं गरजेचे आहे. 

पेट्रोल दरवाढीबाबत राऊत म्हणाले की, इंधन दरवाढीचा चटका भाजच्या पदाधिकाऱ्यांनाही बसत असेल. नरेंद्र मोदींच्या धोरणांवर टीका करणं म्हणजे देशद्रोही ठरवणं, हे चुकीचं आहे. राष्ट्रहितासाठी मोदींवर टीका करणं योग्य आहे. सध्या देशात छुप्या पद्धतीनं आणीबाणी लागू झाली आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com