यापेक्षा जास्त मते कुठल्याही जिमखान्याच्या अध्यक्षाला मिळत असतील! - Former BJP MP Nilesh Rane criticizes Chief Minister Uddhav Thackeray | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

यापेक्षा जास्त मते कुठल्याही जिमखान्याच्या अध्यक्षाला मिळत असतील!

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 15 जुलै 2021

आम्ही पुन्हा त्यांना मतदान करू, असे मत सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ४९ टक्के मतदारांनी नोंदवले.

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  (Chief Minister Uddhav Thackeray) हे देशातले सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री असल्याचे नुकतेच एका सर्वेक्षणातून समोर आले. त्यावरुन भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे  (Nilesh Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. (Former BJP MP Nilesh Rane criticizes Chief Minister Uddhav Thackeray) 

या संदर्भात निलेश राणे यांनी ट्वीट केले आहे. त्यामध्ये निलेश राणे म्हणाले की ''१३ राज्यातील १७ हजार लोकांनी मते दिली, भारताची लोकसंख्या १३० करोड आहे, महाराष्ट्राची जवळपास ११.५ करोड आणि राज्य २९ आहे. यापेक्षा जास्त मते कुठल्याही जिमखान्याच्या अध्यक्षाला मिळत असतील, अशी टीका केली आहे. 

हेही वाचा : बीएचआर घोटाळा; २० टक्के रक्कम भरण्याच्या अटीवर जामीन 

'प्रश्नम' या संस्थेने देशातील १३ राज्यांमध्ये केलेल्या सर्वेक्षणात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री असल्याचे स्पष्ट झाले. याबाबत मुख्यमंत्री महोदयांचे मनापासून अभिनंदन! मुख्यमंत्र्यांनी आधीच सांगितल्याप्रमाणे हे महाविकास आघाडी सरकारचे यश आहे. 

हेही वाचा : अमिताभ बच्चन यांच्याकडून मनसेला मोठेपणा दाखविण्याची प्रतिक्षा 

प्रश्नम या संस्थेने देशातील १३ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीबाबत सर्वेक्षण केले होते. त्यामध्ये उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री म्हणून कामगिरी चांगली आहे. आम्ही पुन्हा त्यांना मतदान करू, असे मत सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ४९ टक्के मतदारांनी नोंदवले. देशातील मुख्यमंत्र्यांच्या सर्वेक्षणात १३ राज्यांमधील सुमारे १७, ५०० मतदारांना याबाबत आपली मते विचारण्यात आली. उद्धव ठाकरेंनी लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत नाव पटकावले आहे.  

Edited By - Amol Jaybhaye 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख