आम्हाला फक्त जगवा; चिपळूणच्या व्यापाऱ्यांचा मुख्यमंत्र्यासमोर आक्रोश 

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात येते त्याच पद्धतीने आम्हालाही शेतकऱ्यांच्या धर्तीवर कर्जमाफी द्या.
 Uddhav Thackeray .jpg
Uddhav Thackeray .jpg

चिपळूण : शेतकऱ्यांप्रमाणे आम्हला ही एकदाच कर्ज द्या. पुन्हा कधीच भीक मागणार नाही, आमचे मायबाप तुम्हीच आहात. आम्हाला फक्त जगवा, असा टाहोच चिपळूणच्या (Chiplun) व्यापाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासमोर फोडला. व्यापाऱ्याचा टाहो ऐकून मुख्यमंत्रीही स्तब्ध झाले. या व्यापाऱ्याचे म्हणणे शांतपणे ऐकून घेत त्यांना मदतीचे आश्वासन दिले. (Chief Minister Uddhav Thackeray inspects the flood affected area at Chiplun) 

शनिवारी तळीये येथील दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (ता. २५ जुलै) चिपळूण येथील पुरपरिस्थितीची पाहणी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपळूणच्या बाजारपेठेत जाऊन व्यापाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी व्यापारी आणि स्थानिकांनी प्रचंड गर्दी केली होती. मुख्यमंत्री व्यापाऱ्यांशी चर्चा करत असतानाच एका व्यापाऱ्याने मुख्यमंत्र्यांसमोर व्यथा मांडली. 

पूर आला त्यात आमचे मोठे नुकसान झाले. आमच्यावर कर्ज आहे. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात येते त्याच पद्धतीने आम्हालाही शेतकऱ्यांच्या धर्तीवर कर्जमाफी द्या. आम्हाला पुन्हा उभे राहण्यासाठी दोन टक्के व्याजाने तेवढेच कर्ज द्या. नंतर आम्ही सरकारकडे कधीच भीक मागणार नाही. तुम्हीच आमचे आईवडील आहात, आम्हाला फक्त जगवा, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. त्यावर तुमच्या समस्यांवर मार्ग काढू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी व्यापाऱ्याला दिले.

पूर का आला? याचा आढावा घेतला

मुख्यमंत्र्यांनी चिपळूणमध्ये पूर येण्याची कारणमिमांसाही केली. पाणी अचानक कसे भरले. पूर का आला याचा आढावा घेण्यात आला आहे. पाणी आणि पूर तुम्हाला काही नवीन नाही हे मला कुणी तरी सांगितले. पाऊस मोठ्या प्रमाणावर पडला त्यामुळे या पुराचे जलव्यवस्थापन करावे लागेल. तुमच्याकडे पूर येऊच नये तसे व्यवस्थापन करावे लागेल. मात्र, त्याला थोडा अवधी लागेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

महिला मुख्यमंत्र्यासमोरच रडली

एका महिलेने मुख्यमंत्र्यांसमोर टाहो फोडला. माझ्या घराच्या छतापर्यंत पाणी आले होते. होते नव्हते. सर्व गेले. तुम्ही काहीही करा, पण आम्हाला मदत करा. साहेब, तुम्हीच मदत करू शकता. मदत केल्याशिवाय जाऊ नका हो, असे ही महिला रडतांना सांगत होती. मुख्यमंत्र्यांनीही थांबून या महिलेसमोर हात जोडत तिला मदत करण्याचे आश्वासन दिले.  

Edited By - Amol Jaybhaye


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com