स्वप्ना पाटकर यांचे नाव घेत नितेश राणेंचा राऊतांवर निशाणा  

महाराष्ट्रात तातडीने नशा मुक्ती कार्यक्रम हाती घेणे गरजेचे आहे.
Nitesh Rane, Sanjay Raut  .jpg
Nitesh Rane, Sanjay Raut .jpg

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी शिवसेना (ShivSena) भवनासंदर्भात केलेले विधानावरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लाड यांच्यावर निराणा साधला होता. त्यावर भाजप आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांनी राऊत यांना टोला लगावला आहे. (BJP MLA Nitesh Rane criticizes Shiv Sena MP Sanjay Raut)  

या संदर्भात नितेश राणे यांनी ट्वीट केले आहे. त्यामध्ये ते म्हणाले की ''नशामुक्त महाराष्ट्र बरोबर "महिलांसाठी सुरक्षित महाराष्ट्र" हाही कार्यक्रम तातडीने घेतला पाहिजे. जेणेकरून डॉ. स्वप्ना पाटकर सारख्या महिलांना न्याय भेटेल! बरोबर ना राऊत साहेब?'' असा टोला राणे यांनी लगावला आहे.

''एकदम बरोबर बोललात राऊत साहेब, महाराष्ट्र नशामुक्त झालाच पाहिजे.. पण..त्याची सुरुवात तुमच्या मालकाच्या “कलानगरातून" करा..जेणेकरून रोज संध्याकाळी DINO च्या घरी होणारे कार्यक्रम एकदाचेच संपतील..!!!'' 

संजय राऊत काय म्हणाले होते?

राऊत ट्वीटमध्ये म्हणाले होते की ''महाराष्ट्रात तातडीने नशा मुक्ती कार्यक्रम हाती घेणे गरजेचे आहे. नाहीतर राजकीय गांजाडयांना मराठी माणूस शिवसेना भवनाच्या फुटपाथवर बेदम चोपलयाशिवाय राहणार नाही. (समझनेवालोंको इशारा काफी है..) शिवसेना भवन हे मराठी अस्मितेचे ज्वलंत प्रतीक आहे. बाटगयांना हे कसे समजणार?

लाड काय म्हणाले होते?
 
भाजपची ताकद काय आहे हे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत आपण दाखवून दिले. कारण, त्यावेळी जी भाजप होती, भाजपला मानणारा कार्यकर्ता विचाराचा जो मतदार होता. तो मतदार आज देखील आपल्या सोबत आहे आणि आता तर सोने पे सुहागा हुआ है…कारण केंद्रीय मंत्री नारायण राणे व राणे कुटुंबीयांना मानणारा देखील खूप मोठास्वाभिमानीचा गट भाजपमध्ये आला आहे.

त्यामुळे भाजपची ताकद ही निश्चितच वाढली आहे. नितेशची पुढच्या वेळी आपण थोडे कार्यकर्ते कमीच आणू, कारण आपण आलो की पोलिसच जास्त येतात. फक्त त्यांना सांगायचे की वर्दी घालून पाठवू नका, त्यामुळे आपल्या हॉलमध्ये बसायला उपयोग होईल. कारण एवढी भीती आमची की त्यांना असे वाटते की हे माहीममध्ये आले, म्हणजे सेना भवन फोडणारच, काही घाबरू नका वेळ आली तर ते देखील करू'', असे लाड म्हणाले होते. 

दरम्यान, आपल्याला काय म्हणायचे होते, याबाबत लाड फेसबुकवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये ते म्हणाले की ''माझे असे म्हणणे होते की आम्ही माहीममध्ये येतो, तेव्हा एवढा बंदोबस्त ठेवला जातो, जणूकाही आम्ही शिवसेना भवनच फोडायला जाणार आहोत. त्या वाक्याचा विपर्यास करून जे काही दाखवण्यात आले आहे, त्यावर माझे हे स्पष्टीकरण आहे. मला कोणत्याही प्रकारे शिवसेना प्रमुखांनी बांधलेल्या वास्तूचा अनादर करायचा नव्हता'' असे लाड यांनी म्हटले आहे.

आपल्या विधानाबद्दल प्रसाद लाड यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. ''जर मी कुणाचे मन दुखावले असेल, तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो”, असेही ते म्हणाले आहेत.पण, यासोबतच, आपल्या व्हिडीओमध्ये घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. जेव्हा आरे ला कारे होईल, तेव्हा कारेला आरेचे उत्तर दिले जाईल असे देखील लाड यांनी स्पष्ट केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com