...तर विमानतळ पेटवू ; उद्धव ठाकरेंना इशारा  - BJP corporator criticizes Chief Minister Uddhav Thackeray | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

...तर विमानतळ पेटवू ; उद्धव ठाकरेंना इशारा 

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 12 जुलै 2021

नवी मुंबईतील प्रस्तावित विमानतळाच्या नामकरणावरून सध्या राजकीय वातावरण तापले आहे.

पनवेल : नवी मुंबईतील प्रस्तावित विमानतळाच्या नामकरणावरून सध्या राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेनेच्या  (ShivSena) नेत्यांनी या विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी केली आहे. तर रायगडमधील भूमिपुत्र आणि नेतेमंडळी दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे या मागणीसाठी आग्रही आहेत. या आधी झालेल्या आंदोलनावेळी १५ तारखेपर्यंत सरकारने निर्णय दि. बा. पाटील यांचे नावा विषयी निर्णय घ्यावा, असा अल्टिमेटम देण्यात आला होता. तरीही राज्य सरकारकडून दिबांच्या नावाबाबत सकारात्मक चर्चा होताना दिसलेली नाही. याच मुद्द्यावर पनवेलचे भाजपचे उपमहापौर जगदीश गायकवाड (Jagdish Gaikwad) यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.  (BJP corporator criticizes Chief Minister Uddhav Thackeray) 

हेही वाचा : मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात राणेंच्या डोक्यावर सर्वाधिक कर्ज; गोयल दुसऱ्या स्थानी

गायकवाड म्हणाले की ''राज्यात आतापर्यंत १७ मुख्यमंत्री होऊन गेले. त्यापैकी एकाही मुख्यमंत्र्याने आपल्या आई-वडिलांचे किंवा इतर नातेवाईकांचे नाव मोठ्या प्रकल्पाला देण्याचा हट्ट धरला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेदेखील मुख्यमंत्री होते, केंद्रात कृषिमंत्री होते... पण ते स्वत: शेतकऱ्यांची भावना जाणतात. त्यांनीही त्यांच्या कारकिर्दीत कधीच सरकारच्या मोठ्या प्रकल्पांना आपल्या नातेवाईकांची नावे देण्याचा हट्ट धरला नाही. पण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र अशा पद्धतीने वागत आहेत. त्यांना ही भूमिका खूपच त्रासदायक ठरू शकते. आंदोलनाची मशाल आता भूमिपुत्रांनी पेटवली आहे. जर दिबांचे नाव दिले गेले नाही, तर त्याच मशालीने आम्ही ते विमानतळ पेटवून टाकू", असा इशारा एका वृत्तवाहिनीशी बोलताना जगदीश गायकवाड यांनी राज्य सरकारला दिला. 

"दि. बा. पाटील हयात असताना त्यांनी भूमिपुत्रांसाठी आंदोलन केले. त्यावेळी त्यांच्याकडे स्वत:चे पक्क घर नव्हते. आपले घर पक्क नसतानाही दुसऱ्यांच्या हक्कांसाठी लढणारा नेता कोणीही पाहिलेला नसेल, पण तो आम्ही पाहिला. बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी नक्कीच आदर आहे. त्यांच्या कुटुंबात कोणाच्याही नावाने घर नाही, असे कोणी आहे का? ते ठाकरे कुटुंबाने सांगावे. आम्ही त्या माणसाचे नाव विमानतळाला द्यायला तयार आहोत. 
भूमिपुत्रांचा विरोध स्वीकारून नाव द्यायला लावू नका. 

हेही वाचा : राज ठाकरे म्हणाले; राज्यात केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग सुरु आहे

जर तुमच्याकडे सगळे काही आहे, तर मग मुद्दाम नाव देण्याचा अट्टहास कशासाठी? उद्धव ठाकरेंनी लक्षात ठेवावे की आगरी आणि कोळी समाजाचे लोक जितके भोळे असतात तितकेच रागीटही असतात. दि. बा. पाटील यांची ताकद उद्धवजींना माहिती नसावी. देशातील बडे नेते बाळासाहे ठाकरे यांना भेटण्यासाठी मातोश्रीवर यायचे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजीही मातोश्रीवर आले होते. मात्र, दि.बां. पाटील यांना भेटण्यासाठी खुद्द बाळासाहेबांना जासई गावात यावे लागले होते, ही त्यांची ताकद होती. त्यामुळे ठाकरे सरकारने हट्ट सोडावा, नाहीतर त्यांना सत्तेत असताना खूप काही त्रास सोसावा लागेल", असेही जगदीश गायकवाड यांनी सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख