भाजपचा आणखी एक नगरसेवक शिवसेनेत  - Another BJP corporator in Shiv Sena   | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपचा आणखी एक नगरसेवक शिवसेनेत 

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 23 जानेवारी 2021

नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. पालिका आपल्याकडे खेचून आणण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मोठी ताकत पणाला लावली आहे.

नवी मुंबई : भारतीय जनता पक्षाचे नेते गणेश नाईक यांना मोठा धक्का बसला आहे. भाजपचे नगरसेवक राम आशिष यादव यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.  

नवी मुंबईत महानगरपालिकेत भाजपला गळती सुरूच आहे. एकूण 13 नगरसेवकांनी भाजपला आता पर्यंत सोडचिठ्ठी दिली आहे. त्यातील काही नगरसेवकांनी शिवसेनेत तर काही नगरसेवकांनी राष्ट्रवादी  मध्ये प्रवेश केला आहे. 

नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. पालिका आपल्याकडे खेचून आणण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मोठी ताकत पणाला लावली आहे. त्यांनी भाजपचे 13 नगरसेवक गळाला लावले आहेत.   

भाजपमधील नगरसेवकांना आपल्या गळाला लाण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षातील मातब्बर नेते मंडळी प्रयत्न करत आहेत. एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबई महानगरपालिका खेचून आण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरु केले आहेत. 
 
दरम्याण आमदार गणेश नाईक यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे दिघ्यातील नवीन गवते, अपर्णा गवते आणि दीपा गवते या तीन माजी नगरसेवकांनी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात भाजपला रामराम केला होता.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी गवते यांनी शिवबंधन बांधले. यापूर्वीदेखील पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे गवतेंना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू होते. पालिका निवडणुकीला काही महिने शिल्लक राहिले असतानाच गवतेंच्या शिवसेना प्रवेशामुळे शिवसेनेने नाईकांना मोठा धक्का दिला आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा नाईकांना धक्का बसला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख