अभ्यासासाठी रागावणाऱ्या आईचा १५ वर्षीय मुलीने केला खून; आत्महत्येचा रचला बनाव

आई आणि मुलगी या दोघींमध्ये झालेल्या झटापटीत आई खाली पडली.
A 15-year-old girl murdered an angry mother for studying
A 15-year-old girl murdered an angry mother for studying

नवी मुंबई  : ऐरोली सेक्टर-७ मध्ये राहणाऱ्या एका १५ वर्षीय मुलीने अभ्यास करण्यासाठी सतत तगादा लावणाऱ्या आपल्या आईचा कराटेच्या कापडी पट्टयाने गळा आवळून खून केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. आईचा खून केल्यानंतर आईने आत्महत्या केल्याचे भासविण्यासाठी त्या मुलीने बेडरुमचा दरवाजा आतून बंद करुन आईच्या मोबाईल फोनवरुन नातेवाईकांना आत्महत्या करत असल्याचा मेसेज पाठविल्याचेही तपासात आढळून आले आहे. ही घटना ३० जुलै रोजी  घडली होती. (A 15-year-old girl murdered an angry mother for studying)

या घटनेतील मृत महिलेचे नाव शिल्पा जाधव (वय ४१) असे असून ती ऐरोली सेक्टर-७ मधील राकेश सोसायटीत पती संतोष जाधव (वय ४४) आणि १५ वर्षीय मुलगी व ६ वर्षांचा मुलगा यांच्यासह राहात होती. आपल्या मुलीने डॉक्टर व्हावे, अशी शिल्पा जाधव व संतोष जाधव या आईवडिलांची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी आपल्या मुलीला मे महिन्यापासून नीट परीक्षेच्या तयारीसाठी क्लास लावला होता. या परीक्षेच्या अभ्यासात मुलीने सातत्य ठेवावे, यासाठी आई शिल्पा जाधव यांची इच्छा होती. त्यामुळे मुलीचे आईसोबत अभ्यासावरुन नेहमी भांडण होत होते. गत २७ जुलै रोजी मुलीने मोबाईल घेतल्याने वडिल तिला रागावले होते, त्यामुळे ती रागावून जवळच राहणारे मामा शैलेश पवार यांच्या घरी गेली होती.

त्यानंतर सायंकाळी मुलीची समजूत काढण्यासाठी शिल्पा जाधव ह्या भावाच्या घरी गेल्या. त्यावेळीही मुलीचा त्यांच्यासोबत वाद झाला होता. या वादात मुलीने आई वडिलांविरोधात पोलिसांत तक्रार करण्याची धमकीदेखील दिली होती. त्यामुळे आईने मुलीला रबाळे पोलिस ठाण्यात नेले होते. त्यावेळी रबाळे पोलिसांनी मुलीची व तिच्या आई-वडीलांची समजत काढून त्यांना घरी पाठवले होते. त्यानंतर ३० जुलै रोजी सकाळी या मुलीचे वडील कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर घरामध्ये ती आई व लहान भावासह होती. दुपारी दोनच्या सुमारास आईने अभ्यासावरून रागावून तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. या वेळी आई आणि मुलगी या दोघींमध्ये झालेल्या झटापटीत आई खाली पडली. त्या वेळी मुलीने कराटेचा बेल्ट आईच्या गळ्याभोवती घट्ट आवळून धरला. हालचाल बंद झाल्यानंतरच तिने आईला सोडले.

आईचा खून हा आत्महत्येचा प्रकार वाटावा, यासाठी मुलीने प्रथम बेडरुमच्या दरवाजाला बाहेरुन असलेली चावी काढून ती आईच्या बेडरुममध्ये ठेवली. त्यानंतर तिने आईचा मोबाईल घेऊन तिच्या व्हॉट्सऍपवरुन वडील, मामा, मावशी यांच्या मोबाईलवर ‘मी सर्व प्रयत्न केले, मी आपले आयुष्य संपवित आहे,’ अशा प्रकारचा इंग्रजीत मेसेज पाठवून बेडरुमचा दरवाजा लावून घेतला. त्यानंतर मुलीने वडिलांना फोन करुन आई बेडरूमचा दरवाजा उघडत नसल्याचे सांगितले. त्यामुळे तिच्या वडिलांनी जवळच राहणारा मेव्हणा शैलेश पवार याला सांगितले. त्याने तत्काळ बहिणीच्या घरी धाव घेऊन बेडरुमचा दरवाजा तोडल्यानंतर बेडरुममध्ये त्याला बहिण मृतावस्थेत पडल्याचे व तिच्या गळ्याभोवती कराटेचा कापडी पट्टा आवळल्याचे दिसून आले. 

या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर रबाळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन शैला जाधव यांचा मृतदेह ताब्यात घेतला. शवविच्छेदनात शैला जाधव यांचा मृत्यू डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे व गळा आवळल्यामुळे झाल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मृत शैला जाधव व त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी सुरु केली. या चौकशीत पोलिसांनी मुलीला विश्वासात घेऊन तिच्याकडे याबाबत विचारपूस केली असता, तिनेच आईचा खून केल्याची कबुली दिली. रबाळे पोलिसांनी या प्रकरणात फिर्यादी होऊन मुलीवर खून व पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन पुढील कारवाईस सुरुवात केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com