नांव कुणाचे..बाळासाहेबांचे? की 'दिबां'चे? - वाद पेटला

नवी मुंबई मधील आंतरराष्ट्रीय विमानतळालाप्रकल्पग्रस्तांचे नेते (स्व.) दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे अशी येथील स्थानिक प्रकल्पग्रस्त आगरी - कोळी समाजाचीसुरवाती पासूनची मागणी असताना नगरविकास मंत्री आणि ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विमानतळाला (स्व.) बाळासाहेब ठाकरे याचे नाव द्यावे असे पत्र मुख्यमंत्र्यांना दिले आहे
D. B. Patil - Balasaheb Thackeray
D. B. Patil - Balasaheb Thackeray

वाशी :  नवी मुंबईमध्ये उभारण्यात येत  असलेल्या आतंरराष्ट्रीय  विमानतळ  प्रकल्पाला नाव देण्यावरून वाद निर्माण झाला आहे. विमानतळाला शिवसेना पक्षप्रमुख (स्व.) बाळासाहेब  ठाकरे  यांचे नाव देण्यावरून हा वाद निर्माण झाला आहे. या विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला  स्थानिक प्रकल्पग्रस्त बरोबर मनसे, भाजप पक्षाने विरोध दर्शविला आहे.

नवी मुंबई मधील आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते (स्व.) दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे अशी येथील स्थानिक प्रकल्पग्रस्त आगरी - कोळी समाजाची  सुरवाती पासूनची मागणी असताना नगरविकास मंत्री आणि ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विमानतळाला (स्व.) बाळासाहेब ठाकरे याचे नाव द्यावे असे पत्र मुख्यमंत्र्यांना दिले आहे. यामुळे नवी मुंबई आणि रायगड मधील स्थानिक प्रकल्पग्रस्तांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. त्यांनी बाळासाहेब ठाकरे  यांच्या नावाला तीव्र विरोध केला आहे

नवी मुंबई महापालिका आणि ग्रामपंचायत निवडणुकी समोर ठेऊन एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब  ठाकरे यांचे नाव देण्याचा मुद्दा आणल्याचा आरोप मनसे ने केला असून, दि. बा. पाटील यांचे नाव न दिल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे भाजप ने देखील बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला विरोध दर्शविला आहे. ठाकरे यांचे नांव विमानतळाला दिल्यास, पनवेल - नवी मुंबई,उरण  मधील स्थानिक प्रकल्पग्रस्त नाराज होतील यामुळे दि. बा. पाटील याचे नाव देण्यात यावे अशी मागणी भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली आहे.    

Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com