राऊत तुम्ही ईडीकडे १२० जणांची यादी पोहोचवाच...आठवलेंचे आव्हान

महाराष्ट्रामधील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी भाजपाच्या सांगण्यावरून EDकाम करीत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. BJPतील बेहीशोबी मालमत्ता कमविणाऱ्या १२० लोकांची यादी आपल्या कडे असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केल्यानतंर याला रामदास आठवले यांनी पलटवार केला आहे.
Sanjay Raut - Ramdas Athavale
Sanjay Raut - Ramdas Athavale

मुंबई : महाराष्ट्रामधील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी भाजपाच्या सांगण्यावरून ED काम करीत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता.  BJPतील बेहीशोबी मालमत्ता कमविणाऱ्या १२० लोकांची यादी आपल्या कडे असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केल्यानतंर याला रामदास आठवले यांनी पलटवार केला आहे. 

संजय राऊत यांच्याकडे भाजपातील नेत्यांची यादी असल्यास त्यांनी त्वरीत ती ईडीकडे द्यावी असे आवाहन आठवले यांनी दिले आहे. भाजपाच्या सांगण्यावरून ईडी काम करीत नसल्याचे स्पष्टीकरण रामदास आठवले यांनी दिले. कामोठे येथे आरपीआयचा कोकण विभागाचा मेळावा घेण्यात आला होता. यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आठवले यांनी महाराष्ट्र सरकारवर ताशेरे ओढले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिला , दलितांवर अन्याय होत असल्याचेही यावेळी आठवले यांनी सांगितले.

मला धमकवणारा अजून जन्माला नाही आलाय. मला धमकी देणारा राहाणार नाही, असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्या विरोधकांना उद्देशून दिला. मी संसदेचा सदस्य आहे, सरकारी कागदाचा मी आदर करतो, असेही राऊत यावेळी म्हणाले. माझ्याकडे देश हलेल एवढी मोठी केस आहे, असा दावाही राऊत यांनी केला होता. त्यावर आठवले यांनी राऊत यांना आव्हान दिले आहे
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com