नवी मुंबईचा, `ये तो ट्रेलर है, पिक्‍चर अभी बाकी है' 

नवी मुंबईकरांच्या मनात "त्या' घोड्याची फिल्म छान तार झाली आहे. त्यामुळे "ये तो ट्रेलर है पिक्‍चर अभी बाकी है'. आपल्याला पिक्‍चर बघायचा आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केले.
Supriya Sule
Supriya Sule

नवी मुंबई : नवी मुंबईकरांच्या मनात "त्या' घोड्याची फिल्म छान तार झाली आहे. त्यामुळे "ये तो ट्रेलर है पिक्‍चर अभी बाकी है'. आपल्याला पिक्‍चर बघायचा आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केले. 

त्या म्हणाल्या, शरद पवारांना राजकारणात पंचावन्न वर्षे झाली. त्यातील पंचवीस वर्ष सत्तेत गेली तर पंचवीस वर्ष विरोधात गेली. या पंचावन्न वर्षात महाराष्ट्रातील जनतेने त्यांना कधी अंतर दिले नाही. ही गोष्ट राष्ट्रवादी पक्ष हे कुटुंब म्हणून लक्षात ठेवले आहे. तसे सगळ्यांनीच लक्षात ठेवले पाहिजे. सत्ता येते आणि जाते. सत्ता जनतेची सेवा करण्यासाठी असते, पदासाठी नसते, ना लाल दिव्यासाठी असते हे लक्षात ठेवा.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी नवी मुंबई येथे कार्यकर्ता मेळावा झाला. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, आमदार शशिकांत शिंदे, माजी खासदार आनंद परांजपे, प्रशांत पाटील, अशोक गावडे उपस्थित होते. यंदा नवी मुंबईत एक हजार एक टक्के सत्ता परिवर्तन होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. साताऱ्याच्या सभेचा फोटो लक्षात ठेवा. पुढचा महापौर हा महाविकास आघाडीचाच होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षावर कडाडून हल्लाबोल केला. भाजपच्या एका बड्या नेत्याने महाराष्ट्रात आमचा ओव्हर कॉन्फिडन्स आणि राष्ट्रवादीकडून केलेलं इनकमिंग नडल्याची कबुली दिल्याचा किस्सा त्यांनी सांगितला. देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, शरद पवार यांनी रिटायर्ड व्हावं. त्यांनी छान मार्गदर्शन केले होते. मात्र महाराष्ट्राने शरद पवारांना रिटायर्ड करायचं नाही, हे ठरवलं होतं. त्यामुळे "एक देवेंद्र फडणवीस क्‍या करेगा?. महाराष्ट्र एक तरफ और देवेंद्र फडणवीस एक तरफ'. असा टोला लगावतानाच, शरद पवार म्हटले असते मी आता देवेंद्र फडणवीस सांगत आहेत तर रिटायर्ड होतो. परंतु महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात नाही ना तसं असे खासदार सुळे यांनी म्हटले. 

त्या म्हणाल्या, गणेश नाईक पक्षात असताना कसा त्यांचा सन्मान होत होता. ब्लॅंक पेपरवर सही होऊन नवी मुंबईत उमेदवारांची नांवे टाकली जात होती. नाईक यांच्या घरातले अन्न खाल्लं आहे. त्यामुळे ते कितीही व कसेही वागले तरीही त्या अन्नाशी गद्दारी कधीच करणार नाही. पक्षात दीड वर्षांपूर्वी कोण टिकेल, कोण लढेल आणि कोण लढणार नाही अशी परिस्थिती होती. रोज उठून आज कोण पक्षातून गेला याची चिंता असायची. कोणी पक्ष सोडून गेला नाही की, बरं वाटायचं. नेते शरद पवार यांना सोडून गेले होते. त्यातील एकही आमदार म्हणून पुन्हा निवडून आला नाही हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. 

त्या पुढे म्हणाल्या, राष्ट्रवादी कॉंग्रेसचं जे 2014 मध्ये झालं तेच 2019 मध्ये भाजपचं झालं. त्यातून शिवसेना वाचली. त्यांच्या हे पटकन लक्षात आले. "दाल मे कुछ काला है. इधरसे निकलो.' उध्दव ठाकरेंनी आपल्यावर विश्वास दाखवला आहे. त्यातूनच महाविकास आघाडीची स्थापना झाली. केंद्र सरकार सव्वा वर्षात कुठलीही टिका करु शकले नाही, कारण ते जेव्हा खाली बोलतात तेव्हा त्यांना पूर्ण ताकदीने महाविकास आघाडी महाराष्ट्रातूनच उत्तर देते. त्यामुळे प्रत्येक जण महाविकास आघाडीचे मॉडेल देशात यायला हवे अशी अपेक्षा व्यक्त करत आहे. 

भाजपच्या आमदाराच्या गुंडगिरीचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यावर बोलताना त्या म्हणाल्या, हा विषय राष्ट्रीय सुरक्षिततेचा आहे. माझ्या देशाचा प्रश्न आहे. देशाच्या सुरक्षिततेचा विषय आहे. त्यामुळे गृहमंत्री अमित शहा यांनी यासंदर्भात "एसआयटी" नेमून चौकशी करावी. देवेंद्र फडणवीस यांच्या लटक्‍या शब्दांनुसार पारदर्शकपणे नक्की काय आहे यांचं उत्तर महाराष्ट्रातील जनतेला द्यावं. "दुध का दुध आणि पानी का पानी' झालं पाहिजे असे आव्हान त्यांनी दिले. याप्रकरणी एप्रिलमध्ये होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात हा मुद्दा लावून धरणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. 

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com