नवी मुंबईत भाजपचाच महापौर होणार; 'या' नेत्याने केला दावा

विरोधकांना दुसरे कोणतेही काम राहीलेले नाही. गेली २५ वर्षे नाईक यांच्यांवर जनतेचे विश्वास कायम ठेवून त्यांच्या हाती सत्ता कायम ठेवली आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीतही गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली भाजपचाच महापौर बसेल असे संजीव नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
नवी मुंबईत भाजपचाच महापौर होणार; 'या' नेत्याने केला दावा
Navi Mumbai Mayor will be of BJP Claims Sanjeev Naik

डोंबिवली - नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक तोंडावर आली असताना भाजपला लागलेली गळती मात्र थांबलेली नाही. शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांची आघाडी होणार असल्याने तसेच आत्तापर्यंत १४ नगरसेवकांनी शिवसेना व राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे. असे असतानाही येत्या निवडणुकीत जनतेची साथ गणेश नाईक यांनाच मिळेल असा दावा माजी खासदार संजीव नाईक यांनी डोंबिवली येथे केला. 

विरोधकांना दुसरे कोणतेही काम राहीलेले नाही. गेली २५ वर्षे नाईक यांच्यांवर जनतेचे विश्वास कायम ठेवून त्यांच्या हाती सत्ता कायम ठेवली आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीतही गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली भाजपचाच महापौर बसेल असे संजीव नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्हा ओबीसी मोर्चाच्या वतीने एक दिवसीय भाजप कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन सोमवारी निळजे पलावा येथे करण्यात आले होते. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना माजी खासदार संजीव नाईक यांनी वरील दावा केला. नवी मुंबई महानगर पालिका निवडणूक येत्या दोन महिन्यात लागण्याची शक्‍यता असल्याने सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. राज्यांत महाविकास आघाडीचा प्रयोग झाल्यानंतर आता येणाऱ्या पाच महानगरपालिका निवडणुका एकत्र लढण्याचा निर्णय तीन पक्षांनी घेतला आहे. नवी मुंबईत तर महाविकास आघाडी झाल्याचे घोषित करून विभागवार तीन पक्षांनी एकत्रित कार्यकर्त्यांचे मेळावे घ्यायला सुरुवातही केली आहे. 

नाईक समर्थक नगरसेवक भाजपला सोडून महाविकास आघाडीत प्रवेश करीत आहेत. येत्या काही दिवसांत आणखी काही नगरसेवकांची घरवापसी होणार असल्याचे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी नुकतेच सांगितले आहे. संजीव नाईक यांना याविषयी विचारले असता केवळ फोडाफोडीचे राजकारण करण्याचे काम विरोधकांना राहीले आहे. तुम्ही नगरसेवक फोडू शकता परंतू जनतेला नाही फोडू शकत. जाती, वर्ण, धर्म यांच्या पलीकडे जाऊन नवी मुंबईचा विकास गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या नगरसेवकांनी केला आहे. 

गेल्या २५ वर्षात ऐन निवडणुकीत अनेक जण सोडून गेले असले तरी नवी मुंबईकरांनी गणेश नाईक यांच्याच हातात कायम सत्ता दिली आहे. आत्तासुद्धा हा विश्वास जनता कायम ठेवेल व भाजपचाच महापौर महापालिकेत बसेल. गणेश नाईक विरुद्ध महाविकास आघाडी असे चित्र निवडणूकीत येत्या दिसेल असेही संजीव यावेळी म्हणाले. भाजप मनसेसोबत युती करणार का याविषयी त्यांनी पक्ष योग्य तो निर्णय घेईल. पक्ष नेतृत्व हे स्थानिक पातळीवरील परिस्थिती लक्षात घेऊनच विचार करतील परंतू आत्तापर्यंत असा कोणताही निर्णय झालेला नसल्याचे सांगितले.
Edited By - Amit Golwalkar

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in