नाना पटोलेही निघाले राज्यपाल कोशियारींना भेटायला... - Nana Patole to meet Governor Koshiyari in price hike issue | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

नाना पटोलेही निघाले राज्यपाल कोशियारींना भेटायला...

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 14 जुलै 2021

राजभवनच बनले आंदोलन संपविण्याचे ठिकाण

मुंबई : महाराष्ट्रातील प्रत्येक राजकीय  तिढ्याची किंवा आंदोलनाची सांगता ही राजभवनावर होते. परीक्षा होत नाही, राज्यपालांना भेटा, ओबीसींचे आरक्षण रद्द झाले तरी राज्यपालांना भेटा, असा ट्रेंड आहे. आता काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळही राज्यपालांची भेट घेणार आहे.

मोदी सरकारच्या कारकिर्दीत पेट्रोल, डिझेल, एलपीजी सिलिंडर, खाद्यतेलाचे भाव गगनाला भिडले आहेत. महागाईतून जनतेला दिलासा देण्याऐवजी मोदी सरकार इंधनाचे दर दररोज वाढवत आहे. सीएनजी व पाईप गॅसचे दर वाढवून जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. काँग्रेस पक्ष या महागाईच्या विरोधात रस्त्यावर उतरुन मोदी सरकारचा निषेध करत असून गुरुवार दि. १५ जुलै रोजी राज्यपालांना भेटणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

वाचा ही बातमी : विदर्भात शिवसेनेला आणखी एक भगदाड?

टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधताना पटोले म्हणाले की, केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाचा फटका सामान्य जनतेला बसत आहे. इंधन, गॅस, खाद्यतेल, डाळींच्या किमती दिवसेंदिवस वाढतच आहेत. जगणे मुश्कील केलेल्या या सरकारविरोधात काँग्रेसने आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे. ७ जुलैपासून राज्यात विविध आंदोलने करून मोदी सरकारच्या या अन्यायी महागाईविरोधात आवाज उठवला आहे. उद्या हँगिंग गार्डनपासून राजभवन पर्यंत सायकल रॅली काढून राज्यपालांना निवेदन देणार आहे. जनतेचा आवाज केंद्र सरकारच्या कानावर पडेल आणि झोपी गेलेल्या मोदी सरकारने जागे होऊन जनतेला दिलासा द्यावा यासाठी काँग्रेसचा संघर्ष सुरु आहे, असे नाना पटोले म्हणाले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख