नवी मुंबई विमानतळाच्या नावासाठी मनसेची भाजपला साथ 

या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजप आमनेसामने उभे ठाकण्याची चिन्हे दिसत आहेत.
MNS supports to BJP for naming Navi Mumbai airport
MNS supports to BJP for naming Navi Mumbai airport

नवी मुंबई : नवी मुंबईतील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामांतराचा वाद आगामी काळात चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. शिवसेनेने या विमानतळाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याची मागणी केली आहे, तर भारतीय जनता पक्षाने लोकनेते दि. बा. पाटील यांचं नाव विमानतळाला देण्याची मागणी रेटली आहे. त्यामुळे ठाकरे की पाटील? या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजप आमनेसामने उभे ठाकण्याची चिन्हे दिसत आहेत. 

दरम्यान, याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते गजानन काळे यांनीसुद्धा भाजपच्या सुरात सूर मिसळत दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला द्यावे, अशी मागणी केली आहे. त्यामुळे मनसेनेही या वादात उडी घेतली आहे. 

एकीकडे औरंगाबाद नामांतराचा वाद वाढत असताना दुसरीकडे नवी मुंबईतील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावाचाही वाद उद्‌भवला आहे. त्यात भाजपला मनसेनेकडून साथ मिळण्याची शक्‍यता आहे, त्यामुळे शिवसेना यातून कसा मार्ग काढणार, याकडे राजकीय धुरिणींची लक्ष लागले आहे. 

लोकभावना लक्षात घेता प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्व. दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे मागणी जोर देऊ धरू लागली आहे. 

स्थानिक प्रकल्पग्रस्त आणि भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी केली आहे. नवी मुंबईतील कोणत्याही मोठ्या प्रकल्पाला पाटील यांचं नाव देण्यात आलेलं नाही. नवी मुंबईची उभारणी करताना "सिडको'ने सक्तीने जमिनी संपादित केल्या होत्या. भूमिपुत्रांना या जमिनींचा योग्य मोबदला मिळावा; म्हणून दि. बा. पाटील यांनी मोठा लढा उभारला होता. 

या आधीच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईतील विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी केली होती. बाळासाहेबांचं योगदान सर्वश्रुत आहे. त्यामुळे त्यांचा गौरव म्हणून या विमानतळाला त्यांचं नाव देण्यात यावं, अशी मागणी शिंदे यांनी केली होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com