कर्नाळा बँक : रामशेठ ठाकूर, विवेक पाटील यांच्यासह ३५ जणांवर जप्तीच्या नोटिसा - Karnala Bank Fraud Notices Against Ramsheth Thakur Vivek Patil | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पूरग्रस्तांना तातडीची मदत; घरात पाणी शिरलेल्यांना १० हजार, अन्न धान्याचे नुकसान झालेल्यांना ५ हजार रुपय मिळणार. वडेट्टीवार यांची घोषणा
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदार व खासदारांचे एक महिन्याचे वेतन पुरग्रस्तांना देण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीत दिली.

कर्नाळा बँक : रामशेठ ठाकूर, विवेक पाटील यांच्यासह ३५ जणांवर जप्तीच्या नोटिसा

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 8 एप्रिल 2021

कर्नाळा बँकेत Karnala Bank झालेल्या ५२६ कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या प्रकरणात निवाड्यापूर्वीच्या मालमत्ता जप्तीचे आदेश बजावून प्रारंभीपासूनच्या सर्व संचालकांसह, मयत संचालकांचे वारस, बँक अधिकाऱ्यांच्या मालमत्तेवर सहकार खात्याने टाच आणली आहे.

पनवेल : कर्नाळा बँकेत Karnala Bank झालेल्या ५२६ कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या प्रकरणात निवाड्यापूर्वीच्या मालमत्ता जप्तीचे आदेश बजावून प्रारंभीपासूनच्या सर्व संचालकांसह, मयत संचालकांचे वारस, बँक अधिकाऱ्यांच्या मालमत्तेवर सहकार खात्याने टाच आणली आहे. यात बँकेचे चेअरमन व शेतकरी कामगार पक्षाचे (PWP) माजी आमदार विवेक पाटील (Vivek Patil) यांच्यासह भाजपाचे (BJP) स्थानिक नेते, माजी खासदार रामशेठ ठाकूर, विधान परिषद सदस्य आ. बाळाराम पाटील, उद्योजक जे. एम. म्हात्रे, अभिजित पाटील आदींचा समावेश आहे. Karnala Bank Fraud Notices Against Ramsheth Thakur Vivek Patil

प्राधिकृत अधिकारी तथा ठाणे (Thane) जिल्हा उपनिबंधक विशाल जाधववर यांनी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. कर्नाळा नागरी सहकारी बँकेत 526 कोटीचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी पनवेल (Panvel) शहर पोलिस Police ठाण्यात गुन्हा दाखल करून राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (CID)  पुणे येथील आर्थिक शाखेकडे तपासकामी वर्ग करण्यात आला होता. 

त्याशिवाय सहकार खात्याने (Co-operative Department) महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 88 अन्वये 18 जूनच्या आदेशानुसार बँकेतील आर्थिक नुकसानीच्या रक्कमेची जबाबदारी निश्चित करण्यासाठी तसेच आर्थिक व्यवहाराची चौकशी करण्यासाठी सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी ठाणे शहर उपनिबंधक विशाल जाधववर यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती.जाधववर यांनी बँकच्या स्थापनेपासूनचे सर्व संचालक, मयत संचालकांचे वारस आणि बँक अधिकारी अशा 39 जणांची 25 नोव्हेंबरला दोषारोप ठेवण्यासाठी आणि त्यांची बाजू मांडण्यासाठी संधी दिली होती.

जाधववर यांनी त्यांच्या अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 95 अन्वये निवाड्यापूर्वीचा किंवा आदेशापूर्वीचा जप्तीचा आदेश का पारित करण्यात येवू नये, अशा आशयाची कारणे दाखवा नोटीस बजावल्याने सर्व संचालक, मयतांचे वारस, बँक अधिकारी यांच्या मालमत्ता जप्तीची कारवाई अटळ मानली जात आहे.  याबाबत ३ मे रोजी सुनावणी होणार आहे. Karnala Bank Fraud Notices Against Ramsheth Thakur Vivek Patil

या प्रकरणातील दोषींवर कारवाई करून संचालकांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश काढून ठेवीदारांना त्यांचे पैसे परत करावेत, ही प्रमुख मागणी घेवून कांतीलाल कडू आणि सहकारी पायाला सहकार खात्याच्या अधिकाऱ्यांचे उंबरठे ओलांडत होते. त्यांच्या प्रयत्नांना अंशत: यश आले आहे. विशाल जाधववर यांनी 5 एप्रिलला 38 जणांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. संचालक रजनीकांत नटवरलाल शाह यांचे निधन झाल्याने आणि त्यांचे कुणीही वारस नसल्याने त्यांना वगळण्यात आले आहे. 
Edited By - Amit Golwalkar

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख