गणेश नाईकांना धक्का; भाजपच्या नगरसेविकेचा राष्ट्रवादीत प्रवेश - Jolt To Ganesh Naik in Navi Mumbai Two BJP Leaders entered NCP | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार, देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, उद्धव ठाकरे आज एकाच व्यासपीठावर

गणेश नाईकांना धक्का; भाजपच्या नगरसेविकेचा राष्ट्रवादीत प्रवेश

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 5 जानेवारी 2021

एका आठवड्यात भाजपचे नेते गणेश नाईक यांना मोठा धक्का बसला आहे. भाजपच्या नगरसेविका दिव्या गायकवाड आणि माजी नगरसेवक वैभव गायकवाड यांनी काही वेळापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्ष प्रवेश केला. 

नवी मुंबई : एका आठवड्यात भाजपचे नेते गणेश नाईक यांना मोठा धक्का बसला आहे. भाजपच्या माजी नगरसेविका दिव्या गायकवाड आणि माजी नगरसेवक वैभव गायकवाड यांनी काही वेळापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्ष प्रवेश केला. 

नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे कोणत्याही क्षणी निवडणूक लागण्याची शक्यता असल्यामुळे इच्छुक उमेदवार जवळपास एक वर्ष झाले स्वखर्चाने प्रभागात काम करतात पालिका आपल्याकडे राहावी यासाठी महा विकास आघाडीच्या बैठकांवर बैठका सुरू झाल्या आहेत. मनसे आणि भाजप नवी मुंबई पालिका निवडणूक एकत्र लढतील अशी चर्चा सुरू आहे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार प्रचारासाठी येणार असल्याची माहिती समोर येते त्यामुळे पालिका निवडणुकीत चांगली रंगत येणार आहे.

आमदार गणेश नाईक यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे दिघ्यातील नवीन गवते, अपर्णा गवते आणि दीपा गवते या तीन माजी नगरसेवकांनी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात भाजपला रामराम केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी गवतेंनी शिवबंधन बांधले. यापूर्वीदेखील पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे गवतेंना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू होते. पालिका निवडणुकीला काही महिने शिल्लक राहिले असतानाच गवतेंच्या शिवसेना प्रवेशामुळे शिवसेनेने नाईकांना मोठा धक्का दिला. त्यानंतर आता पुन्हा एकदा नाईकांना धक्का बसला आहे. 

गणेश नाईकांच्या निकटर्तीयांमध्ये नवीन गवते कुटुंबीयांचा समावेश होता. तीन वेळा गवते दिघ्यातून नगरसेवक राहिले आहेत. दिघा अनधिकृत बांधकामप्रकरणी गवतेंचे नाव समोर आले होते. याप्रकरणी अडचणीच्या काळात नाईकांनी गवतेंचा हात सोडल्यामुळे गवतेंना एकट्याने खिंड लढवावी लागली होती. तेव्हापासूनच गवतेंच्या मनात नाईकांबद्दल दुरावा निर्माण झाला होता. त्यामुळे गवतेंना आपल्या गळाला लाण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षातील मातब्बर नेते मंडळी प्रयत्न करत होती. अखेर शिवसेनेला यात यश आले.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख