खारघरमध्ये आघाडीत बिघाडी; भाजपात मात्र एकजूट कायम - Factionalism surfaced in Mahavikas Aghadi in Kharghar | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पूजा चव्हाण मृत्यप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा

खारघरमध्ये आघाडीत बिघाडी; भाजपात मात्र एकजूट कायम

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 25 जानेवारी 2021

राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस,कॉंग्रेस आणि शिवसेना आघाडीचे सरकार असूनही खारघर ,तळोजा परिसरात आघाडी घटक पक्षात पक्षवाढीसाठी प्रयत्न न करता गटातटाचे राजकारण करताना दिसून येत आहे. तर भाजप मात्र आपल्या कार्यकर्त्याची एकजूट ठेवण्यासाठी विविध उपक्रम हाती घेत पक्षात फूट पडणार नाही याची काळजी घेताना दिसून येत आहे.

खारघर : राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस,कॉंग्रेस आणि शिवसेना आघाडीचे सरकार असूनही खारघर ,तळोजा परिसरात आघाडी घटक पक्षात पक्षवाढीसाठी प्रयत्न न करता गटातटाचे राजकारण करताना दिसून येत आहे. तर भाजप मात्र आपल्या कार्यकर्त्याची एकजूट ठेवण्यासाठी विविध उपक्रम हाती घेत पक्षात फूट पडणार नाही याची काळजी घेताना दिसून येत आहे.

पनवेल पालिका हद्दीत खारघर हा सर्वात मोठा नोड आहे. खारघर सेक्‍टर एक ते चाळीस परिसरातील सेक्‍टर एक ते एकवीस मध्ये भाजपचे बारा तर सेक्‍टर सत्तावीस ते चाळीस मध्ये कॉंग्रेस पक्षाचे दोन नगरसेवक असे चौदा नगरसेवक खारघर मध्ये आहे. पुढील वर्षी होणाऱ्या पालिका निवडणुकीत वाढत्या लोकसंख्येमुळे खारघर परिसरात जवळपास पंधरा नगरसेवकाचा नोड म्हणून पाहिले जाते. खारघर हे आपल्याच अखत्यारीत असावे यासाठी भाजपचे नेते खारघर मधील भाजप कार्यकर्त्यामध्ये गटाचे राजकारण होवू नये सभा,बैठका घेवून कार्यकर्त्यांमध्ये समनव्यय टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत.

मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेस,कॉंग्रेस आणि शिवसेना यांच्यात गटातटाचे राजकारण दिसून येते. मागील वर्षी जिल्हा नेतृत्वाने कार्यकर्त्यांना विश्वसात न घेता खारघर शहर अध्यक्षपदी कॅप्टन एच एस कलावत यांची निवड केली. तेव्हा पासून दुसरा गट कलावत याना अध्यक्ष मानत नाही. तसेच दोन्ही गटाकडून पक्ष वाढीसाठी कोणताही ठोस उपक्रम घेताना दिसत नाही. अशीच अवस्था राष्ट्रवादीची आहे. खारघर मध्ये काही महिण्यापुवी बळीराम नेटके यांचे शहर शहर अध्यक्ष पद काढून त्यांच्या जागी सुरेश रांजवन यांची निवड केली. पुन्हा दोन महिन्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी नेटकेकडे शहर अध्यक्ष पदाची धुरा सोपविली. त्यामुळे हे दोन्ही पदाधिकारी मीच शहराचा अध्यक्ष असल्याचा दावा करताना दिसते. मात्र पक्ष वाढीसाठी कोणीही प्रयत्न करताना दिसून येत नाही.

खारघर शहरात मुंबई, ठाणे परिसरातून वास्तव्यास येणारे बहुतांश नागरिक हे शिवसेनेला मानणारे आहेत. येणाऱ्या शिवसैनिकांना बांधून ठेवण्याचे काम पक्षाच्या कार्यकर्त्यानी करणे आवश्‍यक आहे. मात्र तसा प्रयत्न होताना दिसत नाही. विशेषतः खारघर शहरात रायगड जिल्हा प्रमुख वास्तव्य करीत आहे. त्यामुळे खारघर मध्ये शिवसेनेचा दबदबा असणे आवश्‍यक आहे. पनवेल पालिका निवडणुकीत शिवसेनेला खारघर मधून एकही नागरसेवक निवडून आणू शकले नाही. 

वसाहती मधील कार्यकर्त्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार उपक्रम राबविल्यास वसाहती मधील वरिष्ठ पदाधिकारी कडून सहकार्य मिळत नाही. फलक लावल्यास फोटो वरून वाद निर्माण करतात. त्यामुळे कार्यकर्ते पुढे येवून उपक्रम हाती घेत नाही.काही कार्यकर्ते दोन चार कार्यकर्त्यांना पालिका,सिडको कार्यालयात निवेदन देवून पक्ष वाढीसाठी खूप प्रयत्न करीत असतात. मात्र त्यात जनतेचे हित दिसून येत नाही.वाढत्या शहरीकारांमुळे विविध उपक्रम घेवून जनते पर्यंत जाणे आवश्‍यक आहे. मात्र तसे दिसून येत नाही. या तीनही पक्षात जो नेत्यानी कार्यकर्त्यांना विश्वासात घेवून मोट बांधत नाही. तो पर्यंत पक्षात एकजूट होणार नाही असे दिसते.

नव्याने विकसीत होत असलेल्या तळोजा वसाहतीत अजूनही वॉटर ,मीटर आणि गटर समस्या तीव्र आहे.मात्र भाजप आणि आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून अधिकाऱ्यांना निवेदन देण्या ऐवजी ठोस काम करताना दिसून येत नाही.त्यात वसाहतीत राष्ट्रवादी पक्षात दोन गट आहे.दोन्ही एकमेकांवर कुरघोडी करताना दिसून येते.वसाहती प्रमाणे तळोजा गावात देखील पक्षाचे दोन गट आहे. या गटाच्या राजकारणात पक्ष मात्र मागे पडत असल्याचे दिसून येते.

शिवसेना पक्षातील काही कार्यकर्त्यांशी चर्चा केली असता.पक्षाने मोठी पदे सर्व ग्रामस्थांना देण्यात आली आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करताना अनेक अडचणी येत आहेत. खारघर परिसरात पक्ष वाढीसाठी जनतेचे हित लक्षात घेवून वसाहतीत काम करणाऱ्या चांगल्या आणि होतकरू कार्यकर्त्यांची निवड करून त्यांच्याकडे जबाबदारी सोपविल्यास पक्ष अधिक बळकट होईल, अशी भावना काहीनी बोलून दाखविली.

खारघर मध्ये कॉंग्रेस पक्षात दोन गट नाहीत. पक्ष वाढीसाठी आम्ही प्रयत्न सुरु आहे. नुकताच पनवेलमध्ये पक्ष प्रवेश कार्यक्रम पार पडला.-कॅप्टन कलावत,शहर अध्यक्ष खारघर कॉंग्रेस पक्ष

खारघर मध्ये पक्ष वाढीसाठी कार्यकर्ते जोराने काम करीत आहेत. हळूहळू आघाडी सरकारचे काम नागरिकांना पसंद पडत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षात येणाऱ्या कार्यकर्त्याचा ओघ वाढत आहे. काही दिवसात इतर पक्षातील कार्यकर्ते राष्ट्रवादी पक्षात दिसून येतील. खारघर परिसरात विभाग निहाय बैठका घेवून पक्ष वाढीसाठी प्रयत्न सुरु आहे.- सतीश पाटील,पनवेल जिल्हा प्रमुख राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष

भाजप पक्षात शिस्त आहे.तसेच छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांनी कोणतेही कार्य्रक्रम हाती घेतल्यास त्यास सर्व पदाधिकारी मार्गदर्शन करतात.तसेच वेळोवेळी माजी खासदार रामशेठ ठाकूर ,आमदार प्रशांत ठाकूर कार्यकर्त्याना मार्गदर्शन करीतअसतात.त्यामुळे पक्षात एकजूट कायम आहे.- ब्रिजेश पटेल.शहर अध्यक्ष भाजपा खारघर शहर

शिवसेनेचे पदाधिकारी चांगले काम करीत असल्यामुळे इतर पक्षातील कार्यकर्ते पक्षात प्रवेश करीत आहे.सध्या गटप्रमुख, बुथप्रमुख नेमणूक करून स्थानिक पातळीवर काम सुरू आहे. जे संघटनेचे काम करीत नाहीत, अश्‍या व्यक्तीच्या जागी तरुणांना संधी दिली जाणार आहे. खारघर परिसरात पक्ष अधिक बळकट व्हावा यासाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले जात आहे. -शिरीष घरत,शिवसेना जिल्हा प्रमुख रायगड

Edieted By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख