आशिष शेलारांसमोर आव्हान गणेश नाईक, मंदा म्हात्रेंमध्ये समतोल राखण्याचे

नुकत्याच झालेल्या संघटनात्मक बैठकांमध्ये भाजपने आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या जवाबदारीचे वाटप केले आहे.आशिष शेलार यांना नवी मुंबई पालिका निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून नेमले आहे
Manda Mhatre - Ashish Shelar - Ganesh Naik
Manda Mhatre - Ashish Shelar - Ganesh Naik

मुंबई : नुकत्याच झालेल्या संघटनात्मक बैठकांमध्ये भाजपने आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या जवाबदारीचे वाटप केले आहे. आशिष शेलार यांना नवी मुंबई पालिका निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून नेमले आहे. गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे या दोघांमध्ये समतोल राखत पालिका निवडणुका जिंकून द्यायचे आव्हान आता आशिष शेलार यांच्यापुढे आहे.

तर इतर महापालिका निवडणुकांसाठी मुख्य जबाबदारी आणि प्रभारी यांचे वाटप भाजपने निश्चित करत निवडणुकांच्या तयारीला सुरुवात केली आहे.

भाजपमध्ये जबाबदारी वाटप 

1.. नवी मुंबई

निवडणूक प्रमुख -गणेश नाईक 
निवडणूक सहप्रमूख - मंदा म्हात्रे 
निवडणूक संघटनात्मक जवाबदारी - प्रमुख संजय उपाध्याय
निवडणूक प्रभारी - आशिष शेलार

2..कल्याण डोंबिवली महापालिका

निवडणूक प्रमुख - रवी चव्हाण.
निवडणूक प्रभारी - संजय केळकर.

3..औरंगाबाद महापालिका निवडणूक

निवडणूक प्रमुख - अतुल सावे.
निवडणूक प्रभारी - गिरीश महाजन.
निवडणूक संघटनात्मक जवाबदारी - संभाजी पाटील निलंगेकर.

4..कोल्हापूर महापालिका निवडणुक

निवडणूक प्रमुख - धनंजय महाडिक आणि महेश जाधव.
प्रभारी - शेखर इनामदार, रणजित सिंह निंबाळकर

5..वसई विरार महापालिका निवडणूक

प्रभारी - प्रसाद लाड 
सहप्रभारी -जयप्रकाश ठाकूर, भरत राजपूत

Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com