मुरुडमध्ये सात तासांत 475 मिलीमीटर पाऊस; काही पुलांवरील वाहतूक थांबवली

मुरुड तालुक्यातील पंचवीस गावांमधील दीड हजार नागरिक या मुसळधार पावसाने बाधित झाले आहेत.
475 mm of rain in seven hours in Murud
475 mm of rain in seven hours in Murud

अलिबाग : मुरुड तालुक्यात तास तासात 475. मिलीमीटर इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली असून येथील जनजीवन विस्कळीत झाले. या पावसाने चिखली, विहुर, सुपेगाव, उसरोली येथील लहान पूल कमकुवत झाल्याने पुलावरुन जाणारी अवजड वाहतुक थांबवण्यात आली आहे. मुरुड तालुक्यातील पंचवीस गावांमधील दीड हजार नागरिक या मुसळधार पावसाने बाधित झाले आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. (475 mm of rain in seven hours in Murud)

मुरूड समुद्रात वादळी वारा आणि लाटांमुळे नांगरलेल्या बोटींपैकी दोन बोटीचे दोरखंड तुटल्याने दोन्ही बोटी समुद्रात वाहत गेल्या. आजूबाजूला असलेल्या बोटीतील मच्छीमारांनी त्या वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. पण, त्यात त्यांना यश आले नाही.

उसरोली-सुपेगाव, म्हालुंगे- बारवाई, भोईघर- बेलवाडी या मार्गावरील साकव पूल नादुरुस्त झाल्याने हे मार्ग अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. सोमवारी रात्री दहाच्या सुमारास सुरु झालेला मुसळधार पाऊस मंगळवारी पहाटे पाचपर्यंत सुरु होता. याच दरम्यान समुद्राला भरती आल्याने डोंगरमाथ्यावरुन येणारे पाणी वाहुन जाण्यासाठी मार्गच नव्हता. हा सर्व प्रकार रात्रीत घडल्याने नागरिकांना आपले साहित्य सुरक्षितस्थळी घेऊन जाता आले नाही. 

मुरुडबरोबरच पावसाचा सर्वाधिक जोर श्रीवर्धन श्रीवर्धन (153 मिलीमीटर), म्हसळा (105 मिलीमीटर) या तालुक्यांत होता. पावसाची रिपरिप सुरु असल्याने पंचनामे करण्यासाठी व्यत्यय येत असल्याची माहिती मुरुडचे प्रभारी तहसीलदार गोविंद वाकडे यांनी दिली. बोर्ली मांडला, नांदगाव येथे दुकानांमध्ये तीन पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.

अलिबाग-मुरुड मार्गावरील चिखली गावाजवळील पुल एका बाजूला खचला आहे. या पुलाची काही दिवसांपुर्वी दुरुस्ती करण्यात आली होती. सर्वे परिसरात रात्री पडलेल्या मुसळधार पाऊस पडल्याने नदीला पूर आला होता. पाण्याला वेगही जास्त होता, या वेगाने पुलाची एक बाजू खचली आहे. याठिकाणी अवजड वाहतुकीला बंदी असल्याचा फलक लावण्यात आला आहे.

चार वर्षांनंतर पुन्हा त्याच ठिकाणी कोसळली दरड

चार वर्षांपुर्वी साळाव चेकपोस्टजवळ भली मोठी दरड कोसळली होती. याच ठिकाणी रात्रीच्या पावसात पुन्हा दरड कोसळली आहे. मुरुडकडे जाणाऱ्या रस्त्यावर दरडीची माती मोठ्या प्रमाणात आल्याने हा मार्ग बंद होता. रात्रीतच जेसीबीच्या साहाय्याने दरडीची खाली आलेली माती बाजूला करण्यात आला असून सकाळी पाच  वाजता हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यानंतर मदतकार्य पोचवण्यासाठी अलिबाग येथून  मनुष्यबळ पाठवण्यात आले.

इतका मुसळधार पाऊस यापूर्वी अनुभवला नाही

अतिवृष्टीमुळे काशिदमध्ये सखल भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. चिकनी पुलासह काशिद पुलाचा भागही खराब झाला आहे. रस्त्यांचे नुकसान झाले आहे, तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. इतका मुसळधार पाऊस कधीही अनुभवला नव्हता. सर्वकाही रात्रीच्या काळ्याकुट्ट अंधारात घडत होते, यामधून अनेकांना घरातील साहित्यदेखील सुरक्षितस्थळी नेता आलेले नाही, असे काशिदचे ग्रामपंचायत सदस्य
संतोष राणे यांनी सांगितले. 

अवजड वाहतूक थांबवली

अतिवृष्टीत जीवितहानी झालेली नाही. घरात पाणी शिरल्याने नुकसान झालेले आहे. चिखली, विहुर, सुपेगाव, उसरोली येथील लहान पुल कमकुवत झाले असल्याने येथून होणारी अवजड वाहतुक थांबविण्यात आलेली आहे, असे मुरुडचे निवासी नायब तहसीलदार रवींद्र सानप यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com