विमानतळाला 'दिबां'चे नाव द्या; आमदार प्रशांत ठाकूर यांची आग्रही मागणी - Prashant Thakur wants D B Patil's Name to Navi Mumbai Airport | Politics Marathi News - Sarkarnama

विमानतळाला 'दिबां'चे नाव द्या; आमदार प्रशांत ठाकूर यांची आग्रही मागणी

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 1 जानेवारी 2021

नवी मुंबई विमानतळाला माजी खासदार आणि प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत नेते दि. बा. पाटील यांचे नाव देणे योग्य होईल, अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली आहे. स्थानिक, शेतकरी प्रकल्पग्रस्तांच्या हक्कांसाठी प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांनी दिलेले योगदान प्रेरणादायी आहे. त्यांनी अखेरच्या श्‍वासापर्यंत प्रकल्पग्रस्तांचा विचार केला, असेही ठाकूर यांनी स्पष्ट केले.

पनवेल : नवी मुंबई विमानतळाला माजी खासदार आणि प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत नेते दि. बा. पाटील यांचे नाव देणे योग्य होईल, अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली आहे. स्थानिक, शेतकरी प्रकल्पग्रस्तांच्या हक्कांसाठी प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांनी दिलेले योगदान प्रेरणादायी आहे. त्यांनी अखेरच्या श्‍वासापर्यंत प्रकल्पग्रस्तांचा विचार केला, असेही ठाकूर यांनी स्पष्ट केले.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची सूचना नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. या पार्श्‍वभूमीवर विमानतळाच्या नावाबद्दलची चर्चा अधिक जोर धरू लागली आहे. प्रकल्पग्रस्तांच्या न्याय्य हक्कांसाठी अखेरच्या श्‍वासापर्यंत लढणारे झुंजार नेते स्व. दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देणे उचित ठरेल, अशी आग्रही मागणी नवी मुंबईसह रायगड जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांची आहे. या भूमिकेला पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनीही पाठिंबा दिला आहे.

नवी मुंबई विमानतळ प्रकल्पासाठी पनवेल, उरण तालुक्‍यांतील जमिनींचे भूसंपादन करण्यात आले आहे. या स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या न्याय्य हक्कांसाठी दि. बा. पाटील यांनी मोलाचे योगदान दिले आहे. त्यामुळे त्यांचे कार्य काय आहे हे कोणालाही वेगळे सांगण्याची गरज नाही. त्यामुळे या परिसरात साकारत असलेल्या विमानतळाला त्यांचे नाव देण्यास कुणाचे दुमत नसेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख