सांगलीचे राष्ट्रवादीचे महापौर पवारांच्या भेटीला : 'करेक्‍ट कार्यक्रमा'ची घेतली माहिती 

फुटीर सदस्य यापुढे आपल्यासोबत राहणार का? असा सवाल त्यांनी​केला.
NCP's new mayor of Sangli Digvijay Suryavanshi met Sharad Pawar
NCP's new mayor of Sangli Digvijay Suryavanshi met Sharad Pawar

सांगली : "शहर विकासाकडे लक्ष द्या... झटून कामाला लागा,' असा सल्ला ज्येष्ठ नेते शरद पवार यांना सांगलीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नूतन महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांना आज (ता. 27 फेब्रुवारी) दिला. सांगली महापालिकेतील घडामोडींची पदाधिकाऱ्यांकडून माहिती घेत त्यांनी तेथील राजकारण जाणून घेतले. 

महापौर सूर्यवंशी यांनी आज बारामतीत गोविंदबाग येथे पवार यांची भेट घेतली. या वेळी बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, राष्ट्रवादी युवकचे राहुल पवार, अल्पसंख्याक सेलचे आयुब बारगीर उपस्थित होते. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पवार यांनी सर्व सार्वजनिक कार्यक्रम त्यांनी रद्द केले असून सध्या ते बारामतीत आहेत. सांगली महापालिकेतील विजयानंतर सूर्यवंशी यांनी पवार यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आज (ता. 27 फेब्रुवारी) सकाळी बारामती गाठली. या वेळी पवार यांनी सुमारे वीस मिनिटे त्यांच्याशी चर्चा केली. शहराच्या विविध विकास कामांबद्दल माहिती जाणून घेतली. तुमचे नियोजन काय? अशी विचारणाही केली. शेवटी झटून काम करा, असा सल्ला दिला. 

सांगली महापालिकेत तिसऱ्या क्रमांकाचे संख्याबळ असलेल्या राष्ट्रवादीने थेट महापौरपदावर उडी घेत भाजपचे उमेदवार धीरज सूर्यवंशी यांचा पराभव केला होता. उपमहापौर निवडणुकीतही 39 विरुध्द 36 मतांनीच या निवडणुकीत कॉंग्रेसचे उमेश पाटील यांनीही भाजपचे उमेदवार गजानन मगदुम यांचा पराभव केला आहे. या कार्यक्रमाची इत्यंभूत माहिती शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी दिली. 

शरद पवार यांनी किती सदस्य अनुपस्थित राहिले आणि किती सदस्यांनी विरोधी मतदान केले, हे जाणून घेतानाच फुटीर सदस्य यापुढे आपल्यासोबत राहणार का? असा सवाल केला. त्यावर बजाज यांनी फुटीर सदस्य पूर्वी आपल्याकडेच होते. ते फुटून तिकडे गेले, असा खुलासा केला. पवार यांनी "फुटलेल्या सदस्यांना ताकद द्या, त्यांची कामे करा,' असा सल्लाही दिला. 

निधीसाठी जयंत पाटलांकडे पाठपुरावा करा 

महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी शरद पवार यांना भेट म्हणून सांगलीचे भडंग आणि विजयाबद्दल पेढे दिले. पवार यांनी महापौर व पदाधिकाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थापच मारली. ते म्हणाले," विरोधकांनी आपल्या कार्यकर्त्यांना धाक दाखवून फोडले. तुम्ही त्यांना चांगले प्रत्युत्तर दिले. पण आता जनतेची कामे करा. निधीसाठी जयंत पाटील यांच्याकडे सतत पाठपुरावा करा.'' 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com