गटारीनिमित्त शिवसेनेची विशेष ऑफर; व्हायरल फलकाची जोरदार चर्चा

शिवसेनेच्या या उपक्रमात आगामी वसई-विरार महापालिका निवडणुकीची गणिते दडली असल्याची चर्चा आहे.
Virar Shiv Sena will distribute chicken at low rates
Virar Shiv Sena will distribute chicken at low rates

विरार : येत्या रविवारी (ता. ८ ऑगस्ट) येणाऱ्या दर्श अमावस्या, दीपपूजा (तळीरामांच्या दृष्टीने गटारी अमावस्या) निमित्त विरार येथील शिवसेनेच्या साईनाथ नगर शाखेच्या वतीने अल्प दरात एक किलो चिकन वाटप करण्यात येणार आहे. चिकन वाटपाविषयीचा फलक सोशल मिडीयावर वायरल झाल्याने शहरात उलटसुलट चर्चा सुरू आहे. (Virar Shiv Sena will distribute chicken at low rates)

वायरल झालेल्या फलकामध्ये चिकन मिळविण्यासाठी नागरिकांना आगाऊ नोंदणी करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. तसेच, रविवारी सकाळी ९ ते ११ या वेळेतच चिकन घेण्याची संधी उपलब्ध असणार आहे. विशेष म्हणजे शिवसेनेने प्रसिद्ध केलेल्या फलकावर चिकनचा दर १८० रुपये जाहीर केला आहे. बाजारात सध्या चिकनचा दर २३० ते २४० रुपये आहे. शिवसेनेतर्फे प्रतिव्यक्ती एक किलो चिकन अल्पदरात देण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. 

हेही वाचा : ठाकूर पिता-पुत्रांच्या खेळीमुळे खारघरमध्ये शेकापला घरघर 
 
दरम्यान, शिवसेनेच्या या अल्प दरातील चिकन वाटपात आगामी वसई-विरार महापालिका निवडणुकीची गणिते दडली असल्याची चर्चा आहे. तर काही ठिकाणी शिवसेनेच्या या चिकन वाटपाचे हसे देखील होत आहे. आवश्यक कामे सोडून शिवसेना नको ते उपक्रम राबवून नागरिकांना रिजवू पाहत असल्याची टीकाही होत आहे.

वसई-विरार महापालिकेस न्यायालयाचा इशारा 

 
मुंबई  : वसई-विरार महापालिका क्षेत्रातील सुमारे नऊ हजारांहून अधिक अनधिकृत बांधकामांच्या मुद्यांवर मुंबई उच्च न्यायालयाने आज तीव्र नाराजी व्यक्त केली. या अवैध बांधकामांवर कारवाई करा, अन्यथा वसई-विरार महापालिका बरखास्त करण्याचे आदेश देऊ, असा सज्जड इशारा न्यायालयाने दिला.

वसई-विरार महापालिकेमध्ये अवैध बांधकामे मोठ्या प्रमाणात वाढत असून यामुळे पाण्याचा निचरा होण्यासाठी अडचणी येत आहेत. सरकारी आणि प्रशासकीय जमिनीवरही अतिक्रमण केले जात असून नुकत्याच झालेल्या पावसात वसई-विरारमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती, असे याचिकेद्वारे निदर्शनास आणले आहे. मुख्य न्या. दिपांकर दत्ता आणि न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे यावर आज आॅनलाईन सुनावणी झाली. सध्या महापालिका क्षेत्रात सुमारे ९००० बांधकामे अनधिकृत आहेत, अशी कबुली पालिकेकडून देण्यात आली.
 
कारवाई कशी करणार लेखी द्या

अनधिकृत बांधकामे बारा हजारहून अधिक आहेत, असा दावा याचिकादारांकडून करण्यात आला. यावर काही बांधकामे महापालिका अस्तित्वात येण्याआधी सिडकोच्या क्षेत्रात झाली असे स्पष्टीकरण पालिकेकडून देण्यात आले. मात्र खंडपीठाने यावर नाराजी व्यक्त केली. तुम्ही आरोप-प्रत्यारोप करू नका, मुंबई महापालिकेप्रमाणे तुम्हीदेखील नागरिकांचा जीव धोक्यात घालत आहात, जर असेच सुरू राहिले तर कल्याण, उल्हासनगरसारखी परिस्थिती वसई-विरारमध्ये निर्माण होईल, असे खडे बोल न्यायालयाने सुनावले. या अनधिकृत बांधकामांवर कशा प्रकारे कायदेशीर कारवाई करणार याचा सविस्तर लेखी तपशील दाखल करण्याचे निर्दोष न्यायालयाने दिले असून सुनावणी दोन आठवड्यांसाठी तहकूब केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com