कोविड सेंटरच्या पंधराव्या मजल्यावरून उपचार घेणारे दोन अट्टल कैदी पळाले

कारागृहात 19 एप्रिल रोजी कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.
Two prisoners escaped from the 15th floor of the Kovid Center in Bhiwandi
Two prisoners escaped from the 15th floor of the Kovid Center in Bhiwandi

भिवंडी : मुंबई - नाशिक महामार्गावरील भिवंडीतील रांजनोली चौक येथील टाटा आमंत्रा कोविड सेंटरच्या 15 व्या मजल्यावर कोरोना बाधित असलेल्या 2 अट्टल गुन्हेगार असलेल्या कैद्यांवर उपचार सुरू होते. या दोन्ही कैद्यांनी बाथरूमच्या खिडकीच्या काचा काढून 15 व्या मजल्यावरून बाथरूमच्या पाईपवरून खाली उतरून पसार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकरणी कोनगाव पोलिस ठाण्यात दोघा फरारी आरोपींवर गुन्हा दाखल करून पोलिसांनी शोध सुरु केला आहे. 

गाजीदारा जाफरी  (वय 25) आणि खुर्शीद अब्दुल हमिद शेख (वय 33) असे फरारी झालेल्या दोघा अट्टल कैद्यांची नावे आहेत.

कल्याणच्या आधारवाडी कारागृहात कोरोनाने शिरकाव केला असून कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या 30 कैद्यांना काही दिवसांपूर्वीच कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाबाधित या सर्व कैद्यांना उपचारासाठी ठाणे येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यातच फरारी झालेले गाजीदारा जाफरी आणि खुर्शीद अब्दुल हमिद शेख या दोघांचाही शिक्षा भोगत असताना कारागृहात 19 एप्रिल रोजी कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.

त्यामुळे या दोघांना उपचारासाठी मुंबई-नाशिक महामार्गावरील कल्याण-भिवंडी रस्त्यावरील रांजणोली चौक येथील टाटा आमंत्रा कोविड सेंटरच्या 15 व्या मजल्यावर उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, उपचार सुरु असल्याचा फायदा घेत 15 मजल्यावरच्या रूममधील बाथरूमच्या खिडकीच्या काचा काढून त्यातून बाहेर पडत पाईपवरून खाली येत पळ काढला. 

या प्रकरणी भिवंडी कोनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी या फरारी कैदयांचा शोध सुरु केला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणपत पिंगळे, पोलिस उपनिरीक्षक जीवन शेरखाने अधिक तपास करीत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com